ETV Bharat / state

Karkara Cronch Bird : कृष्णाकाठी गुलाबी थंडीबरोबर परदेशी 'करकरा क्रोंच' पक्षी दाखल; पाहा VIDEO

सांगली येथे कृष्णाकाठी (bank of Krishna river in Sangli) गुलाबी थंडी बरोबर परदेशी पाहुण्या पक्षांचे आगमन झालं आहे. यामध्ये 'करकरा क्रोंच' पक्षी (Karkara Cronch bird) हा पहिल्यांदाच कृष्णाकाठावर पाहायला (First sighting of Karkara Cronch bird) मिळाला असल्याचा पक्षीप्रेमींचा दावा आहे.

Karkara Cronch Bird
करकरा क्रोंच पक्षी
author img

By

Published : Nov 15, 2022, 4:46 PM IST

सांगली : कृष्णाकाठी (bank of Krishna river in Sangli) गुलाबी थंडी बरोबर परदेशी पाहुण्या पक्षांचे आगमन झालं आहे. यामध्ये 'करकरा क्रोंच' पक्षी हा पहिल्यांदाच कृष्णाकाठावर पाहायला मिळत आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर पासून ते सांगलीच्या कृष्णाकाठी आता हा 'करकरा क्रोंच' पक्षी (Karkara Cronch bird) स्थिरावल्याचं पाहायला मिळालेला आहे, विशेष म्हणजे पहिल्यांदाच (First sighting of Karkara Cronch bird) हा 'करकरा क्रोंच' पक्षी कृष्णाकाठी दिसल्याचं पक्षीप्रेमींचा दावा आहे.

प्रतिक्रिया देतांना पक्षीप्रेमी संदीप नाझरे

कृष्णाकाठ बहरला - सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल होतात. यंदा पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडार परिसरात सध्या पक्षांची शाळा भरली आहे. उथळ पाण्यावरील पहाटेच्या धुक्याची झालर बाजूला होताच, पक्षांचा किलबिलाट काठावरची नीरव शांतता भंग करत आहे. या कोंडार परिसरात स्थानिक पक्षांबरोबर देश विदेशातील पाहुण्या पक्षांचे आगमन झाले आहे. गतवर्षी भुवई बदक, छोटा आर्ली हे नवीन पाहूणे पहायला मिळाले होते.

तर यावेळी 'करकरा क्रोंच' पक्षी हे यावर्षीचे प्रमुख आकर्षण ठरला आहे. या रूबाबदार पक्षाच्या दोन जोड्या लक्षवेधक ठरल्या आहेत. जिल्ह्यात प्रथमच गेले दोन दिवस या पक्षाची नोंद झाल्याची माहिती आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे.

कसा आहे हा परदेशी पाहुणा - नाझरे म्हणाले, खरं तर पहिल्यांदाचं कृष्णाकाठी 'करकरा क्रोंच' दाखल झाला आहे. मीटरभर उंचीचा 'करकरा क्रोंच' हा पक्षी पाकिस्तान, चीन, तिबेटसह मंगोलियामधून एव्हरेस्ट पार करून येतो. राजस्थान, गुजरात मध्ये या पक्षांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. 'करकरा क्रोंचला' आपल्या भाषेत कांड्या करकोचा, असेही म्हणतात. करड्या रंगाच्या असलेल्या पक्ष्याच्या डोक्‍यावर करडा पट्टा असतो. सुरेख पांढरी भुवई आणि गळ्यावर काळ्या रंगाचा मफरलप्रमाणे पट्टा आणि कर्कश आवाज व थव्यांनी वास्तव्य करणारा,असे या पक्षाचे वैशिष्ट्य आहेत.

परदेशी पाहुण्यांची कृष्णाकाठी गर्दी - 'करकरा क्रोंच' बरोबरच या ठिकाणी ब्राऊन हेडेड गुल, छोटा कंठेरी चिखल्या, ठिपकेदार तुतवार, पांढरा धोबी, पिवळा धोंबी, करडा धोबी असे पाहूणे पक्षी तसेच खूल्या चोचीचा करकोचा, ब्लॅक आयबीस, कुदळ्या, ढोकरी बगळा, नदी सुरय, हळदी कुंकू बदक, राखी बगळा, टिटवी, धीवर, भिंगरी, पानकावळा, शेकोट्या आदी पाणथळीच्या पक्षांनी कृष्णाकाठावर गर्दी केली आहे. यावर्षी दिर्घकाळ पाऊस पडल्याने दलदलीच्या जागा वाढल्याने पक्षी विखूरल्याचे पहायला मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.