ETV Bharat / state

सांगलीत शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून; ११ जणांवर गुन्हा दाखल

जत तालुक्यातल्या सुसलादमध्ये शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना रविवारी घडली. शेतकऱ्याला मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

author img

By

Published : Jun 24, 2019, 3:21 AM IST

Updated : Jun 24, 2019, 4:39 AM IST

सांगलीत शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून

सांगली - जत तालुक्यातल्या सुसलादमध्ये शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना रविवारी घडली. वसंतराय ऊर्फ निंगाप्पा बनी (वय ५६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सांगलीत शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून

सांगलीच्या जत तालुक्यातील सुसलाद येथील सावंत वस्तीजवळ बनी कुटुंबीयांची वस्ती आहे. येथील भावकीतीलच लोकांशी मृत निगप्पा यांचे शेत जमिनीचा वाद सुरू आहे. तर शेतात बांधण्यात येत असणाऱ्या घराच्या कारणातून मागील काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. दरम्यान, हा वाद तहसील प्रांत व पोलीस ठाण्यापर्यंत गेला. शेताच्या वादातून या दोन कुटुंबात अनेक वेळा तक्रारीही झाले आहेत.

दरम्यान, रविवारी मृत निंगाप्पा बनी व कांतू शिदरीया बनी, मुदका मलकाप्पा बनी,राजेंद्र मल्लाप्पा बनी, रावसाप्पा मल्लाप्पा बनी यांच्यात वाद झाला. या वादातून निंगाप्पा बनी यांना कुऱ्हाड, काट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना कॅमेरात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मृत निंगाप्पाचे भाऊ श्रीशैल बनी यांच्या तक्रारीवरून मुख्य चार संशयितांसह अन्य ७ जणांविरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send file name - MH_SNG_SHET_JAMIN_MURDER_24_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_SHET_JAMIN_MURDER_24_JUNE_2019_VIS_4_7203751

स्लग - शेत जमिनीच्या वादातून शेतकऱ्याचा खून,भावकितल्या लोकांच्या बेदम मारहाणीत झाला मृत्यू.

अँकर - शेत जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याचा खून झाला आहे. भावकीतल्या लोकांनी कुऱ्हाड,काठ्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.जत तालुक्यातल्या सुसलाद मध्ये ही घटना घडली,असून या प्रकरणी
आकरा जणांवर गुन्हा दाखल झाला असून,मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Body:सांगलीच्या जत तालुक्यातील सुसलाद येथे शेत जमिनीच्या वादातून भावकीतील चार जणांनी एकचा कुऱ्हाड, काठ्या , धारधार हत्याराने जबर मारहाण करून खून केल्याची घटना रविवारी घडली आहे.वसंतराय ऊर्फ निंगाप्पा बन्नी,वय 56 असे मयत व्यक्तीचे नाव आहे.रात्री उशिरा उमदी पोलिसा ठाण्यात मुख्य चार संशयितांच्या सह अन्य सात जणांवर गुन्हा दाखल झाले आहेत.या घटनेने सुसलाद गावात एकच खळबळ उडाली आहे.सुसलाद येथील सावंत वस्ती जवळ बनी कुटुंबीयांची वस्ती आहे,येथील भावकीतीलच लोकांशी मयत निगप्पा यांचे शेत जमिनीचा वाद सुरू आहे,तर शेतात बांधण्यात येत असणाऱ्या घराच्या कारणातून सध्या गेल्या काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता.आणि हा वाद तहसील प्रांत व पोलिस ठाण्यापर्यंत ही गेला आहे. शेताच्या वादातून या दोन कुटुंबात अनेक वेळा तक्रारीही झाले आहेत,दरम्यान रविवारी मयत निंगाप्पा बनी व कांतू शिदरीया बनी,मुदका मलकाप्पा बनी,राजेंद्र मल्लाप्पा बनी, रावसाप्पा मल्लाप्पा बनी यांच्यात वाद झाला.आणि या वादातून निंगाप्पा बनी यांना कुऱ्हाड, काट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शेतामध्ये बनी यांना मारहाण करण्यात आली.आणि ही मारहाण कॅमेरात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.या प्रकरणी मयत निंगाप्पाचे भाऊ श्रीशैल बन्नी यांनी मुख्य चार संशयितांसह अकरा जणांच्या विरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

बाईट - श्रीशैल बन्नी - मयत , नातेवाईक . सुसलाद,जत.
Conclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 4:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.