सांगली - कोरोनामुळे सांगली जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मिरजेच्या मालगाव येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० झाली आहे. सोमवारी दिवसभरात ४ नवीन कोरोना रुग्ण आढळले तर १४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या ९१ आणि एकूण कोरोना रुग्णांची संख्या २९८ झाला आहे.
सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. सोमवारी एका उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्ण महिलेचा मृत्यू झाला आहे. मिरजच्या मालगाव येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी आणखी ४ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शिराळा तालुक्यातील निगडी येथील २ जण यात एक ९ महिन्याचे बालक, तर कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील २ जण असे ४ जणांचा समावेश आहे. या सर्वांना मिरजच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.
दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेले १४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातल्या मणदूर येथील ६ जण, माळेवाडी येथील १, आटपाडी तालुक्यातील निंबवडे आणि गळवेवाडी येथील २ जण, मिरज तालुक्यातील बुधगाव आणि सोनी येथील २ जण कडेगाव तालुक्यातील वांगी येथील १, खानापूर येथील भिकवडी १ आणि जत मधील १ असे असे १४ जण कोरोना मुक्त झाले आहेत.
सोमवारी दिवसभरात वाढलेले रुग्ण आणि कोरोना मुक्त झालेले रुग्ण, त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी आता पर्यंत १९७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. १० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.