ETV Bharat / state

आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी गटात राडा, पडळकरांच्या गाडीसह 3 गाड्यांचा तोडफोड...

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवार पळवा-पळवीचा प्रकार आटपाडी याठिकाणी घडला. त्यातून आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस गटात राडा झाल्याचा प्रकार घडला. साठे चौक याठिकाणी घडलेल्या या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांना गंभीर दुखापत झाली.

dispute between shivsena and bjp gopichand padalkar group in sangli
आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना-राष्ट्रवादी गटात राडा
author img

By

Published : Nov 7, 2021, 8:47 PM IST

सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर गट आणि राष्ट्रवादी-शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आटपाडी या ठिकाणी राडा झाला आहे. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर या घटनेमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमधून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी याबाबत बोलताना

पडळकर आणि राष्ट्रवादी शिवसेना गटात राडा -

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवार पळवा-पळवीचा प्रकार आटपाडी याठिकाणी घडला. त्यातून आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस गटात राडा झाल्याचा प्रकार घडला. साठे चौक याठिकाणी घडलेल्या या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्यांच्या ताफयातील तीन गाड्यांची तोडफोड केली आहे.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणाची वस्तुस्थिती तपासात पुढे येईल - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

आटपाडीत तणाव,बंदोबस्त तैनात -

या घटनेनंतर आटपाडीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर जखमी राजू जानकर यांनी आमदार पडळकर यांच्यावर शिवागाळ करत दुखापत केल्याचा आरोप केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या नातेवाईकास राष्ट्रवादी गटात उमेदवारी मिळाल्याने पडळकर यांनी संतप्त होऊन हा प्रकार केल्याचा आरोपही जानकर यांनी केला.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.