ETV Bharat / state

...म्हणून खासदार धैर्यशील माने अन् पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उडाली शाब्दीक चकमक - जिल्हा नियोजन समिती बैठक

सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (दि. 25 जानेवारी) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात पार पडली. यावेळी पोलिसांकडून त्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याने खासदार धैर्यशील माने यांनी पोलीस अधिकाऱ्याला याचा जाब विचारला. पोलीस अधिकाऱ्याने धैर्यशीलतेने त्यांना प्रवेश दिला.

खासदार धैर्यशील माने आणि पोलीस अधिकारी
खासदार धैर्यशील माने आणि पोलीस अधिकारी
author img

By

Published : Jan 25, 2020, 8:10 PM IST

सांगली - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला थेट खासदार धैर्यशील माने यांनाच अडवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून आत प्रवेश नाकारल्याने प्रवेश दारावरच संतप्त खासदार माने आणि पोलीस अधिकारी यांची शाब्दीक चकमक उडाली.

खासदार धैर्यशील माने अन पोलीस अधिकाऱ्यांत उडाली शाब्दीक चकमक

सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज (दि. 25 जानेवारी) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात पार पडली. मात्र, या बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना अडवण्यात आल्याचा प्रकार घडला. बैठक सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले. पण, काही वेळानंतर या ठिकाणी खासदार धैर्यशील माने पोहोचले. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अधिकारी हे माने यांना ओळखत नसल्याने, त्यांनी माने यांना आत जाण्यापासून रोखले. या नंतर खासदार माने हे चांगलेच संतापले.

हेही वाचा - 'कोरेगाव-भीमाप्रकरणी प्रकाश आंबेडकर हेच भिडे आणि एकबोटे यांना वाचवत आहेत'

त्यानंतर आपण खासदार आहोत, मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात जात आहोत आणि तुम्ही कस अडवता, असा प्रश्न केला. यामुळे पोलीस अधिकारी आणि माने यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक उडाली. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बाजूला जात माने यांना आता प्रवेश दिला. मात्र, खासदार यांनाच बैठकीसाठी जाताना अडवल्याच्या घटनेने कार्यालयाच्या आवारात जोरदार चर्चा रंगली होती.

हेही वाचा - सीएए आणि एनआरसी विरोधात सांगलीमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

Intro:File name - mh_sng_03_mp_mane_entry_vis_01_7203751 - to - mh_sng_03_mp_mane_entry_vis_02_7203751

स्लग - खासदारांना न ओळखल्याने पोलिसांनी माने यांना अडवले,संतप्त खासदार माने आणि पोलिसांच्यात उडाली शाब्दिक चकमक...

अँकर - सांगली जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या बैठकीला थेट खासदार धैर्यशील माने यांनाच आडवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांकडून यावेळी आता प्रवेश नाकारल्याने प्रवेश दारावर संतप्त
खासदार माने आणि पोलिसांच्या मध्ये वादावादीचा प्रकार घडला.पण खासदार माने यांना न ओळखल्याने हा प्रकार घडला.Body:सांगली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात पार पडली.मात्र या बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना आडवण्यात आल्याचा प्रकार घडला.बैठक सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सभागृहाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.पण काही वेळानंतर या ठिकाणी खासदार धैर्यशील माने पोहोचले, मात्र या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अधिकारी हे माने यांना ओळखत नसल्याने, त्यांनी माने यांना आत जाण्यापासून रोखले.या नंतर खासदार माने हे चांगलेच संतापले आणि यांनी
आपण खासदार आहोत,मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात जातोय आणि तुम्ही अडवता असा प्रश्न केला,यामुळे पोलीस अधिकारी आणि माने यांच्यात यावेळी शाब्दिक चकमक उडाली. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी बाजूला जात माने यांना आता प्रवेश दिला.मात्र खासदार यांनाच बैठकीसाठी जाताना आडवल्याच्या घटनेने कार्यालयाच्या आवारात जोरदार चर्चा रंगली होती.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.