सांगली - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. आज आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता सांगलीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सांगलीच्या इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सांगलीतील आणखी 25 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते, यामध्ये तब्बल बारा जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 13 मार्च रोजी सौदी अरेबियामधून इस्लामपूर येथील चार जण उमराह देवदर्शन यात्रेनंतर परतले होते आणि त्यानंतर या चौघांना 23 मार्च रोजी कोरोनाची लागन झाली होती. त्यानंतर आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 हून अधिक जणांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते. यामधील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. तर गुरुवारी त्या चार कुटुंबांच्या संपर्कातील इस्लामपूरमधील 2 आणि कोल्हापूरच्या पेठ वडगावमधील एकाला असे तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते. बुधवारी 22 जणांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते. ज्याचे रिपोर्ट आज आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून यामधील तब्बल 12 जणांना कोरोना लागण झाल्याची स्पष्ट झाले आहे.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 23 वर पोहचली आहे.
सांगलीत आणखी 12 नवे कोरोना रुग्ण, आकडा पोहचला 23 वर.. - सांगलीत आणखी 12 नवे कोरोना रुग्ण
आज आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आता सांगलीतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 23वर पोहोचला आहे.