सांगली - मिरजेच्या शासकीय रुग्णालयात एका कोरोनाबाधित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील बाथरूममध्ये गळफास घेऊन सुमन कुंभार या महिलेने आत्महत्या केली आहे. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
हेही वाचा - मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 31 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या
प्रकृती ठीक असताना महिलेची आत्महत्या
मिरज शासकीय रुग्णालय या ठिकाणी सुभाषनगर येथील सुमन कुंभार (वय 38) या कोरोनाबाधित झाल्याने उपचार घेत होत्या. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सुधारलेली होती. ऑक्सिजन पातळीही वाढली होती. प्रकृती ठीक होत असताना सोमवारी सकाळी सुमन कुंभार यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णालयातील स्वच्छतागृहामध्ये कुंभार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या घटनेची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये झाली असून, कुंभार यांनी ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.
हेही वाचा - 'सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून अतिरिक्त ओबीसी आरक्षणाबाबत प्रक्रिया पूर्ण करू'