ETV Bharat / state

दिवसभरात 278 रुग्णांची भर, पालिका क्षेत्रातील 210 जणांचा समावेश - सांगली कोरोना वृत्त

बुधवारी (5ऑगस्ट) तब्बल 278 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 210 जणांचा समावेश. तर उपचार घेणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

corona in sangli
बुधवारी (5ऑगस्ट) तब्बल 278 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
author img

By

Published : Aug 6, 2020, 7:54 AM IST

सांगली - बुधवारी (5ऑगस्ट) तब्बल 278 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 210 जणांचा समावेश. तर उपचार घेणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झालाय. तसेच 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 1,919 तर एकूण आकडा 3,750 वर गेल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

झपाट्याने वाढणाऱया रुग्णसंख्येत बुधवारी आणखी भर पडली. दिवसभरात 278 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उपचार घेणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली 2 ,मिरज 1 ,आष्टा 1,बोरगाव 1,आणि कुपवाड येथील 1 असे 6 जणांची मृतांमध्ये समावेश आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागापेक्षा महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळे पालिका क्षेत्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे.

दिवसभरात सांगली महापालिका क्षेत्रातील तब्बल 210 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शहरातील 138 आणि मिरजेतील 72 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील आजचे (बुधवार) कोरोना रुग्ण
*१) आटपाडी तालुका - 00*
*२) जत तालुका - 01*
*३) क.महांकाळ तालुका - 25*
*४) मिरज तालुका - 13 *
*५) पलुस तालुका - 02 *
*६) वाळवा तालुका - 02*
*७) तासगांव तालुका - 09*
*८) शिराळा तालुका -07*
*९) कडेगाव तालुका -00*
*१०) खानापूर तालुका- 09*

तर उपचार घेणारे जवळपास 91 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
तसेच कोरोना उपचार घेणारे 35 जण हे अतिदक्षता विभागात असून यामधील 19 जण हे ऑक्सिजनवर तर 15 जण हे नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर आणि इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर 01 जण उपचार घेत आहेत.

बुधवारनंतर आता एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,919 झाली आहे. तर जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 3750 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी आज पर्यंत 1,579 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर 113 जणांचा आता पर्यंत मृत्यू झाला आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.