ETV Bharat / state

इस्लामपुरचे आणखी १२ जण कोरोनामुक्त; जिल्ह्याचा कोरोना आकडा केवळ ४ ...

सांगलीच्या इस्लामपूर मधील कोरोना बाधितांचा पोहोचलेला २६ वरचा आकडा आता केवळ ४ झाला. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. गुरुवारी १६ कोरोना बाधित रुग्णांची दुसरी चाचणी घेण्यात आली होती, रात्री उशिरा त्या १२ रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.

decreased
इस्लामपुरचे आणखी १२ जण कोरोनामुक्त; जिल्ह्याचा कोरोना आकडा केवळ ४ ...
author img

By

Published : Apr 10, 2020, 7:48 AM IST

सांगली- इस्लामपुरचे आणखी १२ कोरोनाबाधित रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे २६ पैकी आता २२ जण हे कोरोनामुक्त झाले असून इस्लामपूरमधील कोरोना रुग्णांचा १६ असलेला आकडा आता केवळ ४ इतका राहिला आहे. यामुळे सांगलीकर जनतेला आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगलीच्या इस्लामपूर मधील कोरोना बाधितांचा पोहोचलेला २६ वरचा आकडा आता केवळ ४ झाला. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. गुरुवारी १६ कोरोना बाधित रुग्णांची दुसरी चाचणी घेण्यात आली होती, रात्री उशिरा त्या १२ रुग्णांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. आता केवळ चार रुग्ण मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उरले आहेत.यामध्ये एका दोन वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. २६ पैकी मूळ चौघांना चार दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देऊन संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे २२ रुग्णांची संख्या मिरजेच्या रुग्णालयात होती. त्यानंतर ६ जणांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे सांगलीचा कोरोना बाधितांचा आकडा १० ने कमी होऊन १६ वर पोहचलेला.

गुरुवारी १६ पैकी १२ जणांचे दोन्ही कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे इस्लामपुरच्या कोरोनाबाधितांची संख्या २६ वरुन २२ वर आली नंतर ती १६ वर आली, आणखी १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता केवळ ४ वर आली आहे.या १२ ही जणांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन शासनाच्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

सौदी अरेबियातून १३ मार्च रोजी भारतात दाखल झालेल्या इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील चौघांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर १४ मार्च रोजी इस्लामपूर या गावी आल्यानंतर त्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्यासह २६ जणांना कोरोची लागण झाली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हा आणि राज्य हादरून गेले होते. मात्र, आता हे सर्वजण हळूहळू कोरोना मुक्त होऊ लागल्याने सांगलीकर जनता आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.