ETV Bharat / state

निगडीच्या "त्या" कोरोनाबाधित तरुणीच्या भावाचा रिपोर्ट निगेटिव्ह - जिल्हाधिकारी - जिल्हाधिकारी अभिजित चौधरी

कोरोनाबाधित तरुणीच्या भावाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. बाधित तरुणीच्या भावाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

miraj
शासकीय रुग्णालय
author img

By

Published : Apr 25, 2020, 3:09 PM IST

सांगली - मुंबईतून शिराळ्यातील निगडीमध्ये आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. तर तिच्यासोबत आलेल्या भावाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. बाधित तरुणीच्या भावाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र त्यांच्या संपर्कातील १२ जणांचे अहवाल हे प्रतीक्षेत असल्याची माहितीही जिल्हाधिकारी चौधरी यांनी दिली.

मुंबईहुन शिराळ्याच्या निगडी येथे आलेल्या एका बहीण-भावापैकी बहिणीला शुक्रवारी कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर भावासह कोरोना बाधित तरुणी आणि त्यांच्या संपर्कातील १४ जणांना ताब्यात घेऊन ७ जणांना शिराळा व इस्लामपूर येथील इन्स्टिट्यूट क्वारंटाईन तर जवळच्या संपर्कातील ५ जणांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले.

या सर्वांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्यापैकी कोरोना बाधित तरुणीच्या भावाचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे. तर तरुणाचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने प्रशासन आणि त्या कुटुंबाला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र अजून धोका टळला नसून १२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. खबरदारी म्हणून निगडीसह आसपासची सहा गावे, तसेच कोरोना बाधित तरुणीवर उपचार झालेले इस्लामपूरमधील हॉस्पिटलही प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.