ETV Bharat / state

Sangli Land Dispute पाडलेल्या जागेचा वाद चिघळणार : गोपीचंद पडळकरांच्या भावाकडून उच्च न्यायालयाचा आवमान, मूळ मालकाचा दावा - गोपीचंद पडळकरांच्या भावाकडून

भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांचे जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भावाने जागा पाडल्याचा आरोप मिरजेत करण्यात येत आहे. या जागेचा वाद आता आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे. मूळ कूळ मालकाच्या वारसांनी या जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) सुरू असून ब्रह्मानंद पडळकर यांनी जागा ताब्यात घेण्यासाठी उच्च न्यायालयाचा अवमान ( Contempt Of Court by Gopichand Padalkar Brother ) केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पडळकरांच्या अडचणीत वाढ ( Clam Land Owner In Sangli ) होण्याची शक्यता आहे.

Sangli Land Dispute
पाडलेल्या जागेचा वाद चिघळणार
author img

By

Published : Jan 9, 2023, 2:46 PM IST

सांगली - मिरज शहरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी जागेचा ताब्यात घेण्यासाठी बांधकाम पाडल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळणार आहे. मिरज प्रांताधिकाऱ्यांनी वहिवाटधारकांना नोटीस ( Contempt Of Court by Gopichand Padalkar Brother ) बजावल्या आहेत. याबाबत आज त्यांची बैठक होणार आहे. मात्र आता त्याआधीच या जागेचे मूळ कुळ मालक हे समोर आले आहेत. विष्णु लामदाडे यांनी सर्व जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) सुरू असताना, जागेची खरेदी कशी होऊ शकते ? हा उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचा ( Clam Land Owner In Sangli ) दावा केला आहे. हे सर्व बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

मिरज तहसीलदारांसमोर आज सुनावणी ज्यांची घरे आणि दुकाने पाडली आहेत, ते पीडित वहिवाटदार, कब्जेदारांची आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्यातील जागेच्या वादाप्रकरणी मिरज तहसीलदारांसमोर आज सुनावणी आहे. ही सुनावणी होईपर्यंत तहसीलदार यांनी 145 च्या नोटीस दोन्ही पार्टींना दिल्या होत्या. मात्र त्या अगोदर धक्कादायक माहिती समोर येत आहे.

बेकायदेशीर जमीन खरेदी केली ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी केली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, पडळकर यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप जमिनीच्या मूळ मालकाचे वारस, विष्णू लामदाडे यांनी केला आहे. जमिनीचे मुळ कूळ मालक लामदाडे आणि गुरमुखसिंग चड्डा यांच्यात या जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. 25 मार्चला पुढील तारीख आहे. मात्र त्या अगोदरच पडळकर यांनी बेकायदेशीर जमीन खरेदी करून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लामदाडे यांनी केला आहे. अजून लामदाडे आणि चड्डा यांच्यात जमिनीच्या हक्काबाबत निकाल लागला नाही. चड्डा यांच्याकडून पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केल्याचा आरोप विष्णू लामदाडे यांनी केला आहे.

उच्च न्यायालयात केस सुरू कूळ मालकाचे वारस लामदाडे म्हणाले, 784 अ मधील 49 गुंठे आणि 784 ब 12 गुंठे या जागेच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयात केस सुरू आहे. 1987 पासून जागेच्या बाबतीत न्यायालयीन लढा देत आहोत. गुरमुखसिंग चड्डा यांच्या विरोधात न्यायालयात जागेच्या मालकीबाबत वाद सुरू असून, 9 डिसेंबर 2022 रोजी या जागेच्या वादाबाबत उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील होती. मात्र ती आता 25 मार्चला होणार आहे. न्यायालयीन बाब असताना जागेची खरेदी व्यवहार कसा होऊ शकतो ? हा हायकोर्टाचा अवमान असून जागेची खरेदी आणि जागेचा ताबा घेणे हे कायदेशीर दृष्ट्या चुकीचा असून याबाबत आम्ही आता प्रांताधिकार्‍यांच्या समोर न्यायालयीन बाब समोर आणणार आहे. पण पडळकर यांनी खरेदी ( Sangli Land Dispute ) केलेली जमीन बेकायदेशीर खरेदी केलेली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी विष्णू लामदाडे यांनी केली आहे.

जागा नेमकी कोणाची ? मात्र यापूर्वी लामदाडे आणि चड्डा यांच्यामधील जमिनीच्या हक्काच्या दाव्या संदर्भात वेगवेगळे निकाल लागले आहेत. कधी लामदाडे तर कधी गुरमुखसिंग चड्डा यांच्या बाजूने निकाल यापूर्वी लागला आहे. गुरमुखसिंग चड्डा यांच्या बाजूने काही निकाल लागल्यानंतर सातबारावर नाव लागल्याने जमिनी विक्री केल्याचे देखील समोर आले आहे. मात्र अजुनही जागेबाबत उच्च न्यायालयात केस सुरू असून याबाबतची पुढील तारीख 25 मार्च 2023 आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाची ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.