ETV Bharat / state

सांगली विधानसभेची उमेदवारी दादा घराण्यातच द्या, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

सांगलीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागून तयारीला सुरुवात केली असताना आता वसंतदादा गटाच्या नेत्या आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

आज मदनभाऊ आणि वसंतदादा गटाचा मेळावा घेऊन जयश्री पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जयश्री पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
author img

By

Published : Sep 24, 2019, 11:08 PM IST

Updated : Sep 24, 2019, 11:13 PM IST

सांगली - सांगली विधानसभेची उमेदवारी वसंतदादा घराण्यातच द्यावी, यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सांगलीत आज (मंगळवारी) मदनभाऊ आणि वसंतदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन काँग्रेसमधून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अन्यथा वेगळा विचार करण्याचा गर्भित इशारा काँग्रेसला दिला आहे. त्यामुळे उमेदवारीवरून आता काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मदनभाऊ आणि वसंतदादा गटाचा मेळावा घेऊन जयश्री पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जयश्री पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

काँग्रेस नेते विशाल पाटील यांची प्रतिक्रिया

सांगलीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागून तयारीला सुरुवात केली असताना आता वसंतदादा गटाच्या नेत्या आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे सांगलीत काँग्रेस उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच काँग्रेसला चिन्हाशिवाय लढावे लागले. मात्र, तरीही मोठे मतदान सांगली विधानसभा क्षेत्रात मिळाले होते. त्यामुळे आता याच मतांचा आधार घेऊन काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. यासाठी काही महिन्यापासून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शहरातील गल्लोगल्ली आणि गावोगावी भेटीगाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे. पक्षाकडेही पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारीसाठी रेटा लावला आहे. मागील आठवड्यापर्यंत सांगली विधानसभेसाठी पृथ्वीराज पाटील यांच्याच नावाची काँग्रेस स्तरावर चर्चा होती. त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असताना आज अचानकपणे दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काँग्रेस उमेदवारीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

हेही वाचा -माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार

आज मदनभाऊ आणि वसंतदादा गटाचा मेळावा घेऊन जयश्री पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे गेली अनेक महिने पक्षासाठी राबणारे आणि विधानसभेसाठी दिवसरात्र तयारी करणारे पृथ्वीराज पाटील यांच्यासमोर उमेदवारीचे संकट निर्माण झाले आहे. आज जयश्री पाटील यांच्या समर्थनार्थ विशाल पाटील यांनी भव्य कार्यकर्ता बैठक घेऊन आमच्या उमेदवार जयश्री पाटील याच असतील अशी घोषणाच केली. पक्षाकडून उमेदवारी जाहीर होईल, अशी ग्वाहीही दिली आहे. त्यामुळे सांगली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष उफळणार असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा -पावसाळ्यात दुष्काळ... पाणी टंचाईच्या संकटाने सांगलीतील दुष्काळग्रस्त करतायेत स्थलांतर

Intro:File name - mh_sng_02_congress_umedwari_melava_vis_01_7203751 - mh_sng_02_congress_umedwari_melava_byt_4_7203751

स्लग - सांगली विधानसभेची उमेदवारी दादा घराण्यातचं द्या,अन्यथा वेगळा विचार करू,काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा...

अँकर - सांगली विधानसभेची उमेदवारी वसंतदादा घराण्यातच द्यावी यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सांगलीत आज मदनभाऊ आणि वसंतदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी मेळावा घेऊन काँग्रेसमधून जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी,अन्यथा वेगळा विचार करण्याचा गर्भित इशारा काँग्रेसला दिला आहे.त्यामुळे उमेदवारीवरून आता काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.Body:सांगलीत काँग्रेसच्या उमेदवारीवरून संघर्ष उफळण्याची शक्यता आहे.काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागून तयारीला सुरवात केली असताना, आता वसंतदादा गटाच्या नेत्या आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळे सांगलीत काँग्रेस उमेदवारीचा पेच निर्माण होणार आहे. सांगली लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच काँग्रेसला चिन्हाशिवाय लढावे लागले,मात्र तरीही मोठं मतदान सांगली विधानसभा क्षेत्रात मिळाले होते. त्यामुळे आता याच मतांचा आधार घेऊन काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. यासाठी कहाणी महिन्यापासून शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी शहरातील गल्लोगल्ली आणि गावोगावी भेटीगाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण इच्छुक असल्याचे दाखवून दिले आहे. पक्षाकडेही पृथ्वीराज पाटील यांनी उमेदवारीसाठी रेटा लावला आहे. मागील आठवड्यापर्यंत सांगली विधानसभेसाठी पृथ्वीराज पाटील यांच्याच नावाची काँग्रेस स्तरावर चर्चा होती,त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असताना आज अचानकपणे स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेस उमेदवारीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आज मदनभाऊ आणि वसंतदादा गटाचा मेळावा घेऊन जयश्री पाटील यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत जयश्री पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.त्यामुळे गेली अनेक महिने पक्षासाठी राबणारे आणि विधानसभेसाठी दिवसरात्र तयारी करणारे पृथ्वीराज पाटील यांच्यासमोर उमेदवारीचे संकट निर्माण झाले आहे. आज जयश्री पाटील यांच्या समर्थनार्थ विशाल पाटील यांनी भव्य कार्यकर्ता बैठक घेऊन आमच्या उमेदवार जयश्री पाटील याच असतील अशी घोषणाच केली असून पक्षाकडून उमेदवारी जाहीर होईल अशी ग्वाहीही दिली आहे.त्यामुळं सांगली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून संघर्ष उफळणार असल्याचे दिसून येत आहे.

बाईट: विशालदादा पाटील, काँग्रेस नेते.Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 11:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.