ETV Bharat / state

सांगली महापूर : सानुग्रह अनुदान वाटपाच्या निकषात बदल, नागरिक संतप्त - सांगली

शहरातल्या गवळी गल्ली परिसरात सायंकाळी सुरू असलेल्या सानुग्रह अनुदान वाटप अपार्टमेंटमधील नागरिकांनी बंद पाडले. रविवारपर्यंत इतर अपार्टमेंटमधील कुटुंबांना अनुदान देण्यात आले. मात्र, आता का नाही ? असा संतप्त सवाल करत या पूरबाधित नागरिकांनी अनुदान वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सानुग्रह अनुदान वाटप
author img

By

Published : Aug 20, 2019, 8:08 AM IST

सांगली - शहरात सुरू असलेल्या पूरग्रस्त सानुग्रह अनुदान वाटपावरून गोंधळ उडाला आहे. सानुग्रहाचे निकष बदलण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी शहरातील सानुग्रह अनुदान वाटप बंद पाडले आहे. रविवारपर्यंत अपार्टमेंटमधील नागरिकांनाही 5 हजार रुपयांचे देण्यात येणारे सानुग्रह अनुदान सोमवारपासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांनी बंद पाडले सानुग्रह अनुदान वाटप

प्रत्येक पूरग्रस्त आणि पूरबाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सांगली शहरात प्रत्येक पूरग्रस्त व बाधित कुटुंबाला 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान रोख स्वरूपात देण्याचे काम सुरू आहे. 4 दिवसांमध्ये सांगली जिल्ह्यात जवळपास 9 कोटीहून अधिक अनुदान वाटप करण्यात आले आहे. यामध्ये शहरातल्या ज्या ठिकाण पाणी होते आणि जो अपार्टमेंट पुराच्या विळख्यात होता, त्यामधील सर्व कुटुंबांना 5 हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात आले आहेत. मात्र, सोमवारपासून सरकारकडून अध्यादेश आल्याचे कारण देत, जिल्हा प्रशासनाने अपार्टमेंटमधील ज्या घरांमध्ये पाणी गेले होते, त्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान न देण्याची भूमिका घेतली.

यावरून अपार्टमेंटमधील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरातल्या गवळी गल्ली परिसरात सायंकाळी सुरू असलेल्या सानुग्रह अनुदान वाटप अपार्टमेंटमधील नागरिकांनी बंद पाडले. रविवारपर्यंत इतर अपार्टमेंटमधील कुटुंबांना अनुदान देण्यात आले. मात्र, आता का नाही ? असा संतप्त सवाल करत या पूरबाधित नागरिकांनी अनुदान वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, अधिकाऱ्यांनी शासनस्तरावरून हा निर्णय झाल्याचे सांगत, शासनाच्या निकषाप्रमाणे अनुदान वाटप केले जाईल असे स्पष्ट केले. शासनाच्या या भूमिकेवरून पूरबाधित नागरिकांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय.

त्यामुळे सानुग्रह अनुदान वाटपामध्ये शासनाकडून आता भेदभाव करून खेळखंडोबा करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, आणि नागरिकांचा रोष या सरकारला महागात पडेल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे.

Intro:Feed send file name - mh_sng_03_anudan_vatap_gondhal_vis_01_7203751 - mh_sng_03_anudan_vatap_gondhal_vis_05_7203751

स्लग - सानुग्रह अनुदान वाटपा वरून गोंधळ,अपार्टमेंट मधील कुटुंबाना अनुदान देण्यास नकार दिल्याने संतप्त पुरबाधित नागरिकांना बंद पाडले अनुदान वाटप..

अँकर - सांगली मध्ये सुरू असलेल्या पूरग्रस्त सानुग्रह अनुदान वाटपा वरून गोंधळ उडाला आहे.सानुग्रहाचे निकष बदलण्यात असल्याने संतप्त नागरिकांनी शहरातील सानुग्रह अनुदान वाटप बंद पाडले आहे.कालपर्यंत अपार्टमेंट मधील नागरिकांनाही पाच हजार रुपयांचे देण्यात येणारे सानुग्रह अनुदान आजपासून बंद करण्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.Body:प्रत्येक पूरग्रस्त आणि पूर बाधित नागरिकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता,त्याप्रमाणे सांगली शहरात प्रत्येक
पूरग्रस्त व बाधित कुटुंबाला पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान रोख स्वरूपात देण्याचे काम सुरू आहे.चार दिवसांमध्ये सांगली जिल्ह्यात जवळपास 9 कोटीहून अधिक अनुदान वाटप करण्यात आलेला आहे.यामध्ये शहरातल्या ज्या ठिकाण पाणी होते,आणि ज्या अपार्टमेंटपुराच्या विळख्यात होत्या, त्यामधील सर्व कुटुंबांना पाच हजार रुपये रोख स्वरुपात देण्यात आलेले आहेत.मात्र आज पासून शासनाकडून अध्यादेश आल्याचं कारण देत,जिल्हा प्रशासनाने अपार्टमेंटमधील ज्या घरांमध्ये पाणी गेलं होतं,त्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देण्याची भूमिका घेतली आहे.यावरून अपार्टमेंट मधील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.शहरातल्या गवळी गल्ली परिसरात सायंकाळी सुरू असलेल्या सानुग्रह अनुदान वाटप अपार्टमेंटमधील नागरिकांनी बंद पाडले आहे.कालपर्यंत इतर अपार्टमेंट मधल्या कुटुंबांना देण्यात आलंय,मात्र आता का नाही ? असा संतप्त सवाल करत या पूरबाधित नागरिकांनी अनुदान वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले,मात्र अधिकाऱ्यांनी शासनस्तरावरून हा निर्णय झाल्याचे सांगत,शासनाच्या निकषाप्रमाणे अनुदान वाटप केले जाईल असे स्पष्ट केलंय.
शासनाच्या या भूमिकेवरून पूरबाधित नागरिकांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय.

बाईट- इरफान पटवेगार - पूरबाधित - सांगली.
Conclusion:तर सानुग्रह अनुदान वाटपामध्ये शासनाकडून आता भेदभाव करून खेळखंडोबा करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला,असून हा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही आणि नागरिकांचा रोष या सरकारला महागात पडेल,असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी दिला आहे.

बाईट - पृथ्वीराज पाटील-शहरजिल्हाध्यक्ष, काँग्रेस शहर,सांगली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.