सांगली - माजी नगरसेवक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे यांच्या विरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण व विनयभंग केल्या प्रकरणी पहिल्या पत्नीने पती अशोक कांबळे व त्यांचा दुसऱ्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहिल्या पत्नीला पती व दुसऱ्या पत्नीकडून मारहाण
मिरजेच्या रिपब्लिकन पार्टी युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण शिवीगाळ आणि विनयभंग केल्या प्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, अशोक कांबळे यांच्या पहिल्या पत्नी या भाजी खरेदीसाठी मार्केटमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती अशोक कांबळे हे एका महिलेसोबत आढळून आले. यावेळी त्यांनी पती अशोक कांबळे यांना चार महिने घरी आला नाही, घरी चला असे सांगितले. दरम्यान, वादावादी झाली, ज्यामध्ये अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने मिळून पहिल्या पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. यावेळी आपला विनयभंगही करण्यात आल्याची तक्रार पहिल्या पत्नीने अशोक कांबळे आणि दुसऱ्या पत्नीवर केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण व शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - वाढत्या महागाई विरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवण्याचे आंदोलन