सांगली- राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ सांगली-मिरजेत भाजपच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचार व राज्य सरकारने रद्द केलेल्या निर्णयाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा- लोकशाही धोक्यात आणू नका, 'या' मुद्द्यावर अण्णांनी सरकारचे खेचले कान
राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात भाजपने आज राज्यभर एल्गार पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यात सरकारने भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक लोकहिताचे निर्णय रद्द केले. तसेच सरकारने शेतकऱ्यांना देलेली कर्जमाफी फसवी आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशा अनेक मुद्द्यांवरून सरकार विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
शहरातील स्टेशन चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात महापालिकेच्या महापौर, माजी आमदार, नगरसेवक यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.