ETV Bharat / state

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात तू-तू-मै-मै - सांगली जिल्ह्यातील बातम्या

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती नियोजन आढावा बैठक शनिवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला तिन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह वडणेर समितीचे सदस्य उपस्थित होते.

bjp mla gopichand padalkar criticized minister jayant patil
जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात तू-तू-मै-मै
author img

By

Published : Jun 21, 2020, 6:59 AM IST

सांगली - केवळ जलसंपदा खात्याचे प्रेझेंटेशन आणि आपण काही तर वेगळे करत आहोत, हे दाखवण्याचे काम जलसंपदा मंत्र्यांनी सांगलीत पूरस्थिती बैठक घेऊन केला आहे, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी करत त्याचा निषेध नोंदवला आहे. यासोबत त्यांनी सांगली जिल्ह्यातील पूर नियोजन बाबतीत कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसल्याचे म्हटले आहे. या दरम्यान पडकर आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात तू-तू मै-मै झाली.

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती नियोजन आढावा बैठक शनिवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला तिन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांच्यासह वडणेर समितीचे सदस्य उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर बोलताना...

या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात तू-तू-मै-मै झाली आहे. आपण विचारलेल्या प्रश्नांवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर न देता बैठक बरखास्त करण्याचा इशारा आपणाला दिल्याने आपण बैठकीतून बाहेर पडल्याचे भाजपचे आमदार पडळकर यांनी सांगितले. केवळ जलसंपदा खात्याचे प्रेझेंटेशन आणि सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आपण काही तर वेगळे करत आहोत, हे दाखवण्याचे काम जलसंपदा मंत्र्यांनी सांगलीत पूरस्थिती बैठक घेऊन केल्याचा आरोप यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी करत निषेध नोंदवला आहे.

सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या 35 गावांमध्ये बोटींची मागणी आहे, मात्र एक वर्षात त्याची पूर्तता झाली नाही, केवळ पंधरा बोटींच्या खरेदीचे टेंडर काढण्यात आले आहे. मात्र ज्या कंपनीकडे हे टेंडर आहे. त्यांच्याकडून जपानमधून इंजिन मागवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्यापही इंजिन आले नाहीत. त्यामुळे पुराच्या आधी बोटी उपलब्ध होतील, अशी कोणतीच शक्यता नाही. तसेच जर बोटी उपलब्ध नसतील तर पुराचे काय नियोजन केले आहे, असा प्रश्न आमदार पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - भय पुराचे...कृष्णानदी काठी बोटी तैनात; आयुक्तांसमोर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण

हेही वाचा - महापुराच्या पार्श्वभूमीवर वडनेरे समितीच्या अहवालावर उद्या सांगलीत पार पडणार बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.