ETV Bharat / state

जेव्हा चंद्रकांत पाटलांना बघावी लागते कार्यकर्त्यांची वाट; सांगलीतील भाजप मेळाव्याकडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

सांगलीमध्ये आज (रविवारी) विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पूलाचे भाजपने थाटात उद्घाटन केले. या निमित्ताने भाजप पक्षाचा बुथ कमिटी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा पार पडला.

भाजप मेळाव्याकडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ
author img

By

Published : Sep 8, 2019, 6:10 PM IST

सांगली - एरव्ही कार्यकर्त्यांना मत्र्यांची वाट बघावी लागते. मात्र, आज सांगलीमध्ये चक्क भाजपचे महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरच कार्यकर्त्यांची वाट बघण्याची वेळ आली. बुथ समिती मेळाव्याला भाजप कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच भाजपच्या नेत्यांनी कार्यक्रम उरकून घेतला. तर विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पूलाच्या उद्घाटन कार्यक्रमात डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेने कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री

हेही वाचा - युतीत 50-50 फॉर्म्युला ठरला नाही; गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला

सांगलीमध्ये आज (रविवारी) विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पूलाचे भाजपने थाटात उद्घाटन केले. या निमित्ताने भाजप पक्षाचा बुथ कमिटी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा पार पडला. मात्र, कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ आणि उद्घाटन सोहळ्यावर शिवसेनेने केलेली टीका, यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची सांगलीतील ताकद कमी झाली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सांगलीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विश्रामबागच्या वारणाली गेट येथे रेल्वे उड्डाण पूलाची मागणी होती. अखेर या ठिकाणी पूल बांधण्यात आला. तर या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकत शिवसेनेने पूल बांधण्याचे श्रेय एकट्या भाजपने घेऊ नये, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा - भाजपने शिवरायांच्या नावावर मते मागून त्यांचेच गड-किल्ले विकायला काढले - अशोक चव्हाण

तर महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा सर्व समाजाचा कार्यक्रम होता. यामध्ये कोणाला डावलण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा केला आहे.

दरम्यान, उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सांगली विधानसभा क्षेत्रातल्या भाजप बुथ समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ व स्थानिक नेत्यांनीही मेळाव्याच्या ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा उशिराने हजेरी लावली. मात्र, तरीही कार्यकर्त्यांची उपस्थिती नगण्यच होती.

Intro:File name -mh_sng_02_bjp_melava_vis_01_7203751 - to - mh_sng_02_bjp_melava_byt_05_7203751

स्लग - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पक्षाचा मेळाव्याला कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ...

अँकर - एरव्ही कार्यकर्त्यांना मत्र्यांची वाट बघावी लागते,मात्र आज सांगली मध्ये चक्क भाजपाचे महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कार्यकर्त्यांची वाट बघण्याची वेळ आली. बूथ समिती मेळाव्याला भाजपा कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या नेत्यांनी कार्यक्रम उरकून घेतला.तर पुलाच्या उदघाटन कार्यक्रमात डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेने बहिष्कार टाकला होता..
Body:सांगलीमध्ये आज विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भाजपने थाटात उद्घाटन केलं,आणि या निमित्ताने भाजप पक्षाचा बुथ कमिटी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा पार पडला, पण कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ आणि उद्घाटन सोहळ्यावर शिवसेनेने केलेली टीका,यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा ताकद कमी झाली आहे, का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगलीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विश्रामबागच्या वारणाली गेट येथे रेल्वे उड्डाणपुलाची मागणी होती,आणि अखेर या ठिकाणी पूल बांधण्यात आला आहे. आज राज्याचे महसूल तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन पार पडले,तर या उद्घाटन सोहळ्यासाठी सत्तेत असणार्‍या शिवसेनेला भाजपाने डावलल्याचा आरोप करत,या उद्घाटन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकत ,पूल बांधण्याचा श्रेय एकट्या भाजपाने घेऊ नये असा इशारा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
तर महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी,मात्र हा सर्व समाजाचा कार्यक्रम होता,कोणाला डावलण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा केला आहे.

बाईट - शंभूराजे काटकर - युवा सेना जिल्हा प्रमुख, सांगली.

बाईट - चंद्रकांत पाटील - महसूल मंत्री.

व्ही वो - तर दुसर्‍या बाजूला या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने सांगली विधानसभा क्षेत्रातल्या भाजपा बूथ समिती पदाधिकारी,कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या, या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरवली होती,एरव्ही मंत्री नेते यांच्यासाठी कार्यकर्ते मेळाव्याच्या ठिकाणी ताटकळत पाहायला राहिल्याचे चित्र पाहायला मिळते,मात्र आज सांगलीत याउलट चित्र पाहायला मिळालं, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह भाजपाचे खासदार संजयकाका पाटील,आमदार सुधीर गाडगीळ व स्थानिक नेत्यांनी मेळाव्याच्या ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा ही उशिराने हजेरी लावली,मात्र तरीही कार्यकर्त्यांची उपस्थिती नगण्यच होती.या मेळाव्यासाठी आलिशान मंगल कार्यालय घेण्यात आलं होतं,आणि कार्यक्रम सुरू होऊन संपला तरी हॉलमधील जवळपास अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या, आणि अशात मोजक्या कार्यकर्त्यांच्या समोर नेत्यांनी भाषण ठोकत हा कार्यक्रम उरकून घेतला.

तर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती निर्माण होत असताना, जिल्ह्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील सांगलीतल्या भाजपच्या पक्षीय कार्यक्रमात व्यस्त असल्याची टीका सांगलीतल्या काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

राज्यात भाजपा मध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू असताना ,सांगली मध्ये पक्षाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी फिरवलेली पाठ पाहता,सांगली शहरातील भाजपाला आहोटी तर लागत नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.