सांगली - मिरजेतील अपेक्स केअर रुग्णालयातील 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणाचे पडसाद सांगली महापालिकेच्या महासभेत उमटले आहेत. आयुक्तांवरील कारवाईच्या मागणीवरून भाजपचे नगरसेवक आणि सत्ताधारी काँग्रेस नगरसेवक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. भाजप नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांच्यात भरसभेत हमरीतुमरीचा प्रकार घडला.
अपेक्सचे पडसाद महासभेत -
मिरजेच्या अपेक्स केअर कोरोना रुग्णालयातल्या 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज सांगली महापालिकेच्या पार पडलेल्या महासभेत जोरदार उमटले. सुरुवातीला भाजपाने आक्रमक भूमिका घेत आयुक्त आणि आरोग्य अधिकार्यांवर कारवाईच्या मागणीसाठी तिरडी मोर्चा काढला होता.
अपेक्स प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये महासभेत हमरीतुमरी - सांगली महासभेत नगरसेवकांमध्ये राडा
मिरजेतील अपेक्स केअर रुग्णालयातील 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणाचे पडसाद सांगली महापालिकेच्या महासभेत उमटले आहेत. आयुक्तांवरील कारवाईच्या मागणीवरून भाजपचे नगरसेवक आणि सत्ताधारी काँग्रेस नगरसेवक यांच्यामध्ये चांगलीच जुंपली.