ETV Bharat / state

विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वरांवर पोलिसांची कारवाई, तब्बल ३०० दुचाक्या केल्या जप्त

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत संचारबंदी आहे. नागरिकांची गर्दी रस्त्यावर होऊ नये, याकरता महापालिका प्रशासनाकडून घरपोच सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तसेच किराणामाल आणि भाजीपालासुद्धा त्यांच्या प्रभागात उपलब्ध असतानादेखील अनेकजण विनाकारण आपल्या दुचाकींसह किरकोळ खरेदीसाठी शहरभर फिरत असल्याचे मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या विनाकारण संचारबंदीत गावभर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वरांवर पोलिसांची कारवाई, तब्बल ३०० दुचाक्या केल्या जप्त
विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वरांवर पोलिसांची कारवाई, तब्बल ३०० दुचाक्या केल्या जप्त
author img

By

Published : Mar 31, 2020, 3:16 PM IST

सांगली - विनाकारण किराणामाल आणि भाजीपाला खरेदीच्या नावाखाली शहरभर फिरणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली पोलिसांनी आज(मंगळवार) धडक कारवाई करत संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांच्यावर कारवाई करत दुचाकी जप्त केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत संचारबंदी आहे. नागरिकांची गर्दी रस्त्यावर होऊ नये, याकरता महापालिका प्रशासनाकडून घरपोच सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तसेच किराणामाल आणि भाजीपालासुद्धा त्यांच्या प्रभागात उपलब्ध असतानादेखील अनेकजण विनाकारण आपल्या दुचाकींसह किरकोळ खरेदीसाठी शहरभर फिरत असल्याचे मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलीसांनी आता या विनाकारण संचारबंदीत गावभर फिरनाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

आपला एरिया सोडून दुसरीकडे फिरणाऱ्या दुचाकी धारकांवर आज सकाळपासून कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर आणि शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत सुमारे 300 हुन अधिक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या गाड्यांचे कागदपत्र नाहीत, अशा गाड्यांना संचारबंदी उठल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया करून नंतर त्या मालकांना सोपवण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्या गाड्या पोलीस ठाण्यात राहणार आहेत. तर ज्या गाड्यांचे कागदपत्रे असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व पुन्हा संचारबंदी काळात विनाकारण फिरणार नसल्याचे कबूल करून देण्यात येणार असल्याचे सांगली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.