इस्लामपूर (सांगली) - वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द सारख्या ग्रामीण भागातील सुयश उदयसिंह पाटील या तरुणाने 2021सालात कृषी क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रो हेल्प विंडो हे अॅप बनवून गावाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. सुयश बारामती येथील डॉ. अप्पासाहेब पवार कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर शिक्षण संस्थेत बीएस्सी (अॅग्री.)च्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.
हेही वाचा - गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते अॅपचे अनावरण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी कृषी विभागा मध्ये सुयश ने 'युवर प्रॉब्लेम अवर सोल्युशन' हे ब्रीद असलेल्या हेल्पविंडो अॅपची निर्मिती केली. या अॅपमुळे निश्चितच कृषी विभागात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया विषयीच्या सर्व समस्या थेट कॉन्टॅक्टिंग किंवा गूगल फॉर्म या अॅडव्हान्स टेक्नॉलिजीच्या माध्यमातून सोडवता येणार आहेत. तसेच, या अॅपच्या माध्यमातून शासकीय व खाजगी विद्यालय मधील जे राउंड असतील, त्यांचीही विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे. यामुळे सुयशने बनवलेल्या अॅपचा कृषी विभागात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते अॅपचे अनावरण करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस महाराष्ट्र प्रदेश सरचटणीसपदी सुयशची निवडही करण्यात आली.
जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव
सुयश पाटील याचे वडील उदयसिंह पाटील हे वशी गावातील शाळेमध्ये शिक्षक आहेत. तर, आई गृहिणी आहे. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या म्हणीप्रमाणे सुयश लहानपणापासून हुशार व नवनवीन प्रयोग करण्यात आघाडीवर होता. शालेय जीवनापासून तो हुशार असल्याने त्याला बारामती येथे शिक्षणासाठी पाठवले. आई-वडिलांचा विश्वास सुयशने सार्थ करून दाखवला. तर, सुयशच्या कर्तबगारीची दखल मंत्री जयंत पाटील यांनीही घेतली. यामुळेच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचटणीस पदी सुयशची निवड करण्यात आली. या निवडीमुळे व हेल्प अॅपमुळे सुयशवर सध्या जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा - ..सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या शिवसेनेला लोकांनी ओळखलंय - राम कदम