ETV Bharat / state

दीडशे किलोमीटर पायी प्रवास करत दुष्काळग्रस्तांची दिंडी सांगलीमार्गे मुंबईकडे रवाना.. - पाटबंधारे विभाग

दुष्काळग्रस्त साताऱ्याला पोहोचल्यावर खासदार उदयनराजे यांचीही भेट घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबईपर्यंतच्या मार्गावर जाताना अनेक लोकप्रतिनिधींनाही दुष्काळग्रस्तांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे.

दुष्काळग्रस्तांची दिंडी सांगलीमार्गे मुंबईकडे रवाना होताना.
author img

By

Published : Jun 10, 2019, 6:09 PM IST

सांगली - पाणी मिळावे, या मागणीसाठी जत ते मंत्रालय निघालेली दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी आज सांगलीत पोहोचली. दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करत सांगलीमार्गे दुष्काळग्रस्त मुंबईकडे रवाना झाले. राजकारण विरहित निघालेली दुष्काळग्रस्तांची ही दिंडी आज जवळपास दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करत सांगलीत पोहचली होती. यावेळी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देत ही दिंडी मुंबईकडे रवाना झाली आहे.

दिंडीचे आयोजक यांनी सांगली येथे 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला.

आजपर्यंत पंढरपूर मधील पांडुरंगाच्या दरबारात पाण्यासाठी बरेच साकडे घातले. आता मंत्रालयात बसलेल्या विठुरायाच्या दरबारात आपण जात असल्याची भावना तुकाराम महाराजांनी व्यक्त केली. तालुक्यातील राजकारणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वंचित असणाऱ्या गावांना अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरून मायथळ तलावातील पाणी कॅनॉल खुदाई करून वस्पेट येथील तलावात सोडायला. त्यामुळे वंचित गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. असे असताना लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे विभाग प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सरकारने या तालुक्यांना वंचित गावांना पाणी द्यावे. नाहीतर लोकसहभागातून दहा किलोमीटरचा कॅनॉल खुदाई करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी तुकाराम महाराजांनी यावेळी केली.

अधिवेशना दरम्यान 20 जून रोजी दुष्काळग्रस्तांची दिंडी मुंबईत दाखल होणार आहे. रोज 35 ते 40 किलोमीटरचा पायी प्रवास करून मुक्काम करत, पायी दिंडी मुंबईकडे मार्गस्थ होत आहे. दुष्काळग्रस्त साताऱ्याला पोहोचल्यावर खासदार उदयनराजे यांचीही भेट घेणार आहेत. त्याचबरोबर मुंबईपर्यंतच्या मार्गावर जाताना अनेक लोकप्रतिनिधींनाही दुष्काळग्रस्तांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्यासाठी साकडे घालण्यात येणार आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AVBB

Feed send File name - MH_SNG_DUSHKAL_DINDI_10_JUNE_2019_WKT_7203751 - TO -

स्लग - दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करत दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी सांगली मार्गे मुंबईकडे रवाना..

अँकर - पाणी मिळावे,या मागणीसाठी जत ते मंत्रालय निघालेली दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी आज सांगलीत पोहोचली.दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करत सांगली मार्गे दुष्काळग्रस्त मुंबईकडे रवाना झाले आहेत. यावेळी या दिंडीत 'ईटीव्ही भारताने'ही सहभाग घेत दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Body:व्ही वो - सांगलीच्या जत तालुक्यातल्या पूर्व भागातील हे ४६ गावे वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित आहेत. खरेतर हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.म्हैसाळ सिंचन योजनेमुळे तालुक्याचा पाण्याचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात सुटला असल,तरी दुष्काळाची दाहकता आजही कायम आहे.सध्याच्या घडीला जत तालुक्यात तब्बल 100 हून अधिक टँकर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम करतात.आणि दुष्काळग्रस्तांची थोड्या प्रमाणात तहान भागत आहे.पण तालुक्यातील पूर्व भागात पाण्याची टंचाई गंभीर आहे.यामुळे म्हैसाळ सिंचन योजनेत समावेश नसणाऱ्या गावांना सिंचन योजनेत समावेश करून पाणी द्यावे,यासाठी पाण्यापासून वंचित असणारये ४६ दुष्काळग्रस्त गावांना आता उठाव केला आहे.पाणी द्या यासह विविध मागण्या घेऊन दुष्काळग्रस्त मुंबईकडे निघाले आहेत.बागडे महाराजांचे शिष्य तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर धडक देण्यासाठी जतच्या संख मधून मंत्रालय पायीदिंडी काढण्यात आली आहे.राजकारण विरहित निघालेली दुष्काळग्रस्तांची ही दिंडी आज जवळपास दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास करत सांगलीत पोहचली होती.यावेळी जिल्हाधिकारयांना निवेदन देत ही दिंडी मुंबईकडे रवाना झाली आहे. दुष्काळग्रस्तांच्या या दिंडीत ईटीव्ही भारताने ही काही वेळ सहभाग घेत,दुष्काळ ग्रस्तांच्या पाण्याच्या बसणारा व्यथा जाणून घेतल्या.गावात आज पिण्याचा पाण्याचा टँकर आठ-आठ दिवसांनी येतो,मात्र तोही अपुरा आहे,त्यामुळे रोज तीन-चार किलोमीटरची पायपीट करावी लागते.यामुळे सरकारने याकडे गंभीर पूर्वक पाहून पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवणे गरजेचा असल्याचे मत दुष्काळग्रस्तांनि ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केले आहे.

तर आज पर्यंत पंढरपूर मधील पांडुरंगाच्या दरबारात पाण्यासाठी बरेच साकडे घातले तर आता मंत्रालयात बसलेल्या विठुरायाच्या दरबारात आपण जात असल्याची भावना तुकाराम महाराजांनी व्यक्त करत ,तालुक्यातील राजकारणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळे तालुक्यातल्या पाण्याचा प्रश्न रेंगाळत पडल्याचा आरोप केला आहे वंचित असणाऱ्या गावांना अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरून मायथळ तलावातील पाणी कॅनॉल खुदाई करून वस्पेट येथील तलावात सोडल्यास वंचित गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो असताना लोकप्रतिनिधी आणि पाटबंधारे प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे सरकारने एक तरी या तालुक्यांना वंचित गावांना पाणी द्यावे नसेल,तर लोकसहभागातून दहा किलोमीटरचा कॅनॉल खुदाई करण्यासाठी परवानगी द्यावी,अशी मागणी तुकाराम महाराजांनी यावेळी केली.अधिवेशना दरम्यान 20 जून रोजी दुष्काळग्रस्तांची दिंडी मुंबईत दाखल होणार आहे.आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आपण या सर्व गोष्टी निदर्शनास आणून देऊ ,पण पाण्याच्या प्रश्न सुटल्या शिवाय माघार नाही,असा निर्धार यावेळी तुकाराम महाराज यांनी व्यक्त केला आहे.या दिंडी दरम्यान त्यांचीशी बातचीत केली आहे.ईटीव्ही भारतचे सांगली प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.

Conclusion:रोज 35 ते 40 किलोमीटरचा पायी प्रवास करून मुक्काम करत,पायी दिंडी मुंबईकडे मार्गस्थ होत आहे.साताऱ्यातही ही भेंडी पोहोचून खासदार उदयनराजे यांची भेट घेणार आहे.त्याचबरोबर मुंबई पर्यंतच्या मार्गावर जाताना अनेक लोकप्रतिनिधींनाही दुष्काळग्रस्तांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे साकडे घालण्यात येणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.