सांगली - मराठी अभिनेता वैभव मांगले आज नाटकाचे शो दरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळले आहेत. सांगलीच्या भावे नाट्यगृहात अलबत्या गलबत्या नाटकाचा शो सुरू असताना ही घटना घडली आहे. घटनेनंतर मांगले यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
अभिनेते वैभव मांगले यांचा आज सांगली मध्ये आलबत्या-खलबत्त्या या नाटकाचा शो होता. विष्णुदास भावे नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता नाटकाचा शो सुरू झाला आणि काही वेळात नाटक सुरू असताना स्टेजवरच वैभव मांगले यांना अचानक चक्कर आली मांगले हे स्टेजवर कोसळले.यानंतर नाटकाचे संयोजकांची एकच धावपळ उडाली.
यानंतर नाटकाचा शो रद्द करत तातडीने मांगले यांना सांगलीच्या क्रांती कार्डीअक या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशक्तपणामुळे मांगले यांना चक्कर आल्याचे डॉक्टरांच्याकडून सांगण्यात आले.असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.