सांगली - इस्लामपूर येथे लग्नाचे आमिष दाखवून तसेच 18 लाख रुपये उकळत एका विद्यार्थ्याने विधवा शिक्षिकेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थी व शिक्षक या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना आज (बुधवारी) उघडकीस आली आहे. याप्रकरणी संभाजी अर्जुन कोकरे (वय-26 रा. अंकलखोप ता. पलूस) याच्यावर अॅट्रासिटी कायद्यानुसार बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा संभाजी कोकरे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा - संतापजनक! अल्पवयीन मुलीवर बापाकडून सतत ५ वर्ष बलात्कार.. नराधमला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळवा तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयात पीडित शिक्षिका कार्यरत होती. अंकलखोप तालुका पलूस येथील संभाजी कोकरे हा 2014 ला बारावीचे शिक्षण घेत होता. त्यावेळी शिक्षिका व संभाजी कोकरे या यांची तोंडओळख झाली. संभाजी कोकरे याने पीडित शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार केला. या प्रकाराची वाच्यता कुठेही केली तर माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईन अशी धमकीही संभाजीने पीडितेला दिली होती.
दोघांमध्ये वारंवार शरीर संबध झाले होते. मार्च 2014 ला चारचाकी गाडी व मोटारसायकल घेण्यासाठी संभाजीने पीडितेकडून 1 लाख 40 हजार रुपये घेतले. तर 2015 ला गणपतीपुळेला नेऊन पीडितेवर बलात्कार केला. 2016 ला पीडितेच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये काढून चारचाकी विकत घेतली. त्यानंतर नोकरीच्या ठिकाणी बदनामी करण्याची भीती दाखवून 13 मे 2017 ला सांगलीला नेऊन मंगळसूत्र घेऊन दिले. त्यामुळे पीडितेला आरोपी लग्न करणार असा विश्वास वाटला. 18 मार्च 2019 रोजी पीडितेच्या एचडीएफसी बँकेतून अडीच लाख रुपये काढले. तसेच पीडितेच्या घरी जाऊन वारंवार बलात्कार केला.
जुलै 2019 मध्ये इस्लामपूर येथील पीडितेच्या नावावरील प्लॉट विकून तब्बल बारा लाख रुपये संभाजी कोकरे याने घेतले. या प्रकारानंतर संभाजीने पीडित महिलेला वारंवार मारहाणी करण्यास सुरुवात केली. पीडित महिला ही संभाजीकडे लग्नासाठी तगादा लावत होती. परंतु, संभाजीने लग्नाला टाळाटाळ करत बलात्कार करून पैशाची मागणी करत मारहाण करत होता. या बद्दलची माहिती पीडितेने आई व भावाला दिली. यानंतर पीडित महिलेने इस्लामपूर पोलिसात तक्रार दाखल केली असून, संभाजी कोकरे याला इस्लामपूर पोलिसांनी अटक करुन वैदकीय तपासणी केली आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे करत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! भाजीत मीठ न टाकल्याने पत्नीची हत्या, पती फरार