सांगली - जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या थ्रीडी पेंटिंग व रांगोळी या कलाविष्काराने इस्लामपूरकर भारावून गेले होते. अँड्रॉइड मोबाईलचा काळ लक्षात घेऊन त्या माध्यमातून कलेची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने 'आर्ट व्हीला' या कला संस्थेच्यावतीने 'संभुआप्पा उरुस'निमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सांगलीच्या इस्लामपूरमध्ये 'संभुआप्पा उरुस'निमित्त 'आर्ट व्हीला' या कला संस्थेच्यावतीने 'थ्रीडी आर्ट पेटींग' आणि 'रांगोळी प्रदर्शन' भरवण्यात आले होते. एक जगप्रसिद्ध व वेगळी संकल्पना आपल्या परिसरात साकारून सर्वसामान्य लोकांना कलेबद्दलची आवड निर्माण व्हावी. तसेच कलादृष्टिकोन दृढ व्हावा, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
हेही वाचा - सांगलीच्या ५ जिगरबाज सायकलपटूंचा सांगली ते कन्याकुमारी सायकल प्रवास
सध्याच्या अँड्रॉइड मोबाईल व सेल्फी जमान्याची असणारी आवड लक्षात घेऊन ही चित्र संकल्पना साकारण्यात आली होती. चित्रकार गणेश पोतदार व कलाशिक्षक संतोष ढेरे यांच्या संकल्पनेतून संभुआप्पा उरुसनिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला इस्लामपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
हेही वाचा - सांगलीच्या महिला बीएसएफ जवानाचा विजेच्या झटक्याने मृत्यू, आज अंत्यसंस्कार