ETV Bharat / state

सामाजिक बांधिलकी, कुरपळमधील ३५ तरुणांनी केले रक्तदान - कुरपळमधील ३५ तरुणांनी केले रक्तदान

आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर कुरळप येथील पत्रकार दिलीप मोहिते यांनी कुरळप बॉईज या ग्रुपवर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यानंतर गावातील 35 तरुण रक्तदात्यांनी रक्तदान करत मोलाची साथ दिली.

कुरळप येथील तरुणांनी रक्तदान करून जोपासली बांधिलकी

author img

By

Published : Mar 31, 2020, 10:17 AM IST

सांगली - सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे, रुग्णालयांमध्ये रक्ताची उणीव भासू लागली आहे. यासाठी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर कुरळप येथील पत्रकार दिलीप मोहिते यांनी कुरळप बॉईज या ग्रुपवर रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. यानंतर गावातील 35 तरुण रक्तदात्यांनी रक्तदान करत मोलाची साथ दिली.

वाळवा तालुक्यातील कुरळप येथील तरुणांनी कलम १४४ चे पालन करत रक्तदान करून माणुसकी जपली आहे. इस्लामपूरमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामीण भागात सध्या भीतीचे वातावरण आहे. रक्ताचा तुटवडा असल्याने आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने कुरळप येथील तरुणांनी पुढाकार घेत रक्तदान केले.

कुरळप येथील तरुणांनी रक्तदान करून जोपासली बांधिलकी

यावेळी कुरळप पोलीस स्टेशनचे सपोनी अरविंद काटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर, कुरळप पोलीस स्टेशनचे पो. को. अनिल पाटील, माजी उपसरपंच गणेश सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवकचे खंडेराव घनवट, प्रदीप वरपे, शिवाजी भालकर, BTM बॉईज ग्रुपचे सर्व सदस्य यांनी रक्तदान केले. तांदुळवाडी येथील बापुसो बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष बापुसो कांबळे यांनी सर्व रक्तदात्यांना आणि कुरळप पोलीस स्टेशनमधील पोलिसांना मास्कचे वाटप केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.