ETV Bharat / state

सांगलीत १२ तासात दोन खुनाच्या घटना; एक विद्यार्थी तर दुसरा गुंड - एक विद्यार्थी तर दुसरा गुंड हत्या सांगली

दोन खुनाच्या घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सांगलीत १२ तासात दोन खुनाच्या घटना
author img

By

Published : Nov 13, 2019, 5:10 PM IST

Updated : Nov 13, 2019, 6:54 PM IST

सांगली - शहरात 12 तासात दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. एका तरुणाचा चाकूने भोसकून तर एका गुंडाची हत्या करून मृतदेह पाण्याच्या डबक्यात फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सांगलीत १२ तासात दोन खुनाच्या घटना

हेही वाचा- कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त

पहिली घटना-

शहरातील नेमिनाथ नगर येथे बसवराज सिध्दाप्पा लद्दे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणावर धारदार शस्त्राने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बसवराज हा गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या हातावर दोन आणि मांडीवर दोन, असे एकूण चार वार करण्यात आले. जखमी अवस्थेत बसवराज याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बसवराज याचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. बसवराज हा एका महाविद्यालयात शिक्षण घेण्याबरोबर फोटो आणि व्हिडिओ शुटींगचा व्यवसाय करत होता. चार ते पाच जणांनी हा खून केला असून नेमक्या कोणत्या कारणातून ही हत्या झाली आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरी घटना-
शहरातील अहिल्यानगर येथील श्रेयस कवठेकर या रेकॉर्डवरील गुंडाचा खून झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. माधवनगर कॉटन मिल रोडवरील एका पाण्याचा डबक्यात पोत्यात मृतदेह घालून दगड बांधून फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कवठेकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून गेल्या चार दिवसांपासून तो बेपत्ता होता. आज त्याचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात मिळाला आहे. यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला आहे. तर ही हत्या कोणी केली हे स्पष्ट होऊ शकले नाही.

मात्र, शहरात दोन ठिकाणी झालेल्या दोन खुनाच्या घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Intro:File name - mh_sng_01_murder_vis_01_7203751 - to - mh_sng_01_murder_img_04_7203751

स्लग - १२ तासात दोन खुनाच्या घटना,तरुणाचा चाकूने भोसकून तर गुंडाचा पाण्यात फेकून खून...

अँकर - सांगलीत दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत.एका तरुणाचा चाकूने भोसकून तर एका गुंडांची हत्या करून मृतदेह पाण्याच्या डबक्यात फेकून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील दोन दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Body:सांगली शहरात गेल्या 12 तासात दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत.एक महाविद्यालय तरुण आणि एका गुंडाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील नेमिनाथ नगर येथे बसवराज सिध्दाप्पा लद्दे (वय २०,रा.बापट मळ्याशेजारी, सांगली) या महाविद्यालयीन तरुणावर धारदार शस्त्राने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास खूनी हल्ला करण्यात आला होता.या हल्ल्यात बसवराज हा गंभीररित्या जखमी झाला आहे.त्याच्या हातावर दोन आणि मांडीवर दोन असे एकूण चार वार करण्यात आले आहेत.जखमी अवस्थेत बसवराज याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.आणि उपचारा दरम्यान बसवराज याचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला आहे. बसवराज हा एका महाविद्यालयात शिक्षण घेण्याबरोबर फोटो आणि व्हिडीओ शुटींगचा व्यवसाय करत होता. तर चार ते पाच जणांना हा खून केला असून नेमक्या कोणत्या कारणातून ही हत्या झाली आहे ,हे अजून स्पष्ट होऊ शकले नसून या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तर शहरातील अहिल्यानगर येथील श्रेयस कवठेकर या रेकॉर्डवरील गुंडाचा खून झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे.माधवनगर कॉटन मिल रोडवरील एका पाण्याचा डबक्यात पोत्यात मृतदेह घालून दगड बांधून फेकून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.कवठेकर हा पोलीस रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून गेल्या चार दिवसांपासून तो बेपत्ता होता.आणि आज त्याचा मृतदेह पाण्याच्या डबक्यात पोत्यात बांधून फेकून देण्यात आल्याचे समोर आले आले आहे.यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ,मृतदेह बाहेर काढत पंचनामा केला आहे.तर ही हत्या कोणी केली,हे स्पष्ट होऊ शकले नाही.

तर शहरात दोन ठिकाणी झालेल्या दोन खुनाच्या घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Conclusion:
Last Updated : Nov 13, 2019, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.