ETV Bharat / state

बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू, दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील घटना - दापोली लेटेस्ट न्यूज

साकुर्डे गनेशनगर (जंगमवाडी) येथील विनोद मनोहर बैकर (वय ३३) हा तरुण बुधवारी ३१ मार्च रोजी सकाळी गावाजवळ असणाऱ्या रहाटीमध्ये शिकारीसाठी गेला होता. थोड्या वेळाने बंदुकीचा आवाज आला आणि हा तरुण मृतावस्थेत जंगलात आढळला.

ratnagiri letest news,   ratnagiri youth death,   ratnagiri dapoli news,   दापोली लेटेस्ट न्यूज ,  बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू
विनोद मनोहर बैकर
author img

By

Published : Apr 1, 2021, 4:43 PM IST

Updated : Apr 1, 2021, 7:06 PM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील एका तरुणाचा बंदुकीची गोळी लागू मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मात्र, ही गोळी नेमकी कशी लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. साकुर्डे गनेशनगर (जंगमवाडी) येथील विनोद मनोहर बैकर (वय ३३) हा तरुण बुधवारी ३१ मार्च रोजी सकाळी गावाजवळ असणाऱ्या रहाटीमध्ये शिकारीसाठी गेला होता. जाताना त्याने जवळच्या वाडीतील तरूणाला शिकारीसाठी येतोय का, असे विचारले होते, मात्र मला घरी काम असल्याचे सांगून त्यानेही जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे तो एकटाच गेला होता.

बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू..
गोळी कशी लागली हे अस्पष्ट -

सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास रहाटीमधून बंदुकीचा आवाज आला. विनोदने शिकार केली असे समजून काम करीत असलेला तरुण रहाटीकडे धावला. रहाटीमध्ये गेल्यावर विनोद कुठेच दिसत नव्हता, म्हणून तो विनोदला हाका मारू लागला. मात्र विनोद काहीच प्रतिसाद देत नसल्याने त्याने शोधाशोध केली असता विनोद एका दगडाजवळ त्याला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. विनोदला त्याच्याच बंदुकीची गोळी लागल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. विनोद हा विवाहित असून त्याला २ मुले आहेत. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गोळी नेमकी कशी लागली हे पोलीस तपासातूनच स्पष्ट होईल.

हेही वाचा - 'राजा होण्यासाठी मन मोठं लागतं', आमदार नितेश राणे यांची ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका

Last Updated : Apr 1, 2021, 7:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.