ETV Bharat / state

आता एसटीतही 'व्हीटीएस' यंत्रणा : रत्नागिरी एसटी विभागातील 654 बसेसमध्ये 'व्हीटीएस' यंत्रणा

author img

By

Published : Jan 26, 2021, 6:59 AM IST

रत्नागिरीतील एसटी देखील आता ट्रँकिंग मोडवरती असणार आहे. रत्नागिरीतील तब्बल 654 गाड्यांवर व्हिटीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे.

vehicle tracking system Installed In Ratnagiri ST division bus
आता एसटीतही 'व्हीटीएस' यंत्रणा : रत्नागिरी एसटी विभागातील 654 बसेसमध्ये 'व्हीटीएस' यंत्रणा

रत्नागिरी - रत्नागिरीतील एसटी देखील आता ट्रँकिंग मोडवरती असणार आहे. रत्नागिरीतील तब्बल 654 गाड्यांवर व्हिटीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

एसटी बसमध्येही व्हिटीएस यंत्रणा
राज्य परिवहन महामंडळानेही अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेप्रमाणे महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हिटीएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना संबंधित एसटी कोणत्या मार्गावर धावत आहे. एस.टी.चा शेवटचा थांबा कोणता होता, बस स्थानकावर येण्यास किती अवधी लागणार आहे. शिवाय बस सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ प्रवाशांना समजावी, अपघात झाल्यास घटनास्थळी तत्काळ मदत पोहोचविता यावी, यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

रत्नागिरी एसटी विभागातील 654 बसेसमध्ये 'व्हीटीएस' यंत्रणा
रत्नागिरी विभागातील 654 गाड्यांना व्हीटीएस
एस.टी. स्थानकातून बस सुटल्यानंतर कोठे थांबली, किती वेळ थांबली, पुढे कोणता थांबा केला अथवा नाही, याबाबतची माहिती प्रशासनाला एका ठिकाणी प्राप्त व्हावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सर्व बसमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रत्नागिरी विभागातील 654 बसगाड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
रत्नागिरी आगारातील सर्वाधिक 124 गाड्यांवर व्हीटीएस यंत्रणा
सुरुवातीला नाशिक विभागात प्रायोगिक तत्त्वावर व्हीटीएस यंत्रणा सुरू करण्यात आली होती. नाशिकमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता तो राज्यभरात सर्वत्र राबविण्यात येत आहे. रत्नागिरी विभागातही आतापर्यंत 654 बसगाड्यावर व्हीटीएसयंत्रणा बसविण्यात आली असून रत्नागिरी आगारातील सर्वाधिक 124 गाड्यांवर व्हीटीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. तर दापोली आगारात 77, खेडमध्ये 47, चिपळुणात 83, गुहागरात 74, देवरुखात 108, लांजा 50, राजापूर 60, मंडणगडमध्ये 31 बसेसवर व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

हेही वाचा - सलग सुट्ट्यामुळे कोकणातील समुद्रकिनारे 'हाऊसफुल्ल'

हेही वाचा - तोट्यातील रत्नागिरी एसटी विभागाला मालवाहतुकीमधून दोन कोटींचे उत्पन्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.