ETV Bharat / state

रत्नागिरी रिफायनरी समर्थनासाठी वज्रमूठ

author img

By

Published : Oct 6, 2020, 6:20 PM IST

रिफायनरी प्रकल्प राजापूरमधून जाऊ नये, यासाठी समर्थक आक्रमक झाले आहेत. आज राजापूरात रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थकांची सर्वपक्षीय बैठक झाली.

All-party meeting of Ratnagiri refinery supporters
रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थकांची सर्वपक्षीय बैठक

रत्नागिरी- रिफायनरी प्रकल्प राजापूरमधून जाऊ नये, यासाठी समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळेच आता रत्नागिरी रिफायनरी समर्थनासाठी वज्रमूठ घट्ट केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजापूरात रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थकांची बैठक झाली. विशेष म्हणजे ही बैठक सर्वपक्षीय होती.

राजापूर येथील ज्येष्ठ विधीज्ञ आणि राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर शहरातील मातोश्री सभागृहात ही सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत दारी आलेला रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प जावू द्यायचा नाही, अशी भुमिका घेण्यात आली.

बेरोजगारीचा प्रश्न कायमचा सोडवायचा असेल. तसेच भौतिक विकासाच्या बाबतीत मागास राहिलेल्या राजापूर तालुक्याचा सर्वांगिण विकास करायचा असेल. आणि मंदीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या राजापूर बाजारपेठेला पुन्हा उर्जितावस्था आणायची असेल तर आपल्या दाराशी आलेला रिफायनरी प्रकल्प जावू न देणे, ही एक संवेदनशिल नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. असा वज्रनिर्धार राजापूर येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ बैठकीत करण्यात आला.

राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत सुतार

या समर्थकांच्या बैठकीला व्यासपीठावर कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेकर, सचिव अविनाश महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आबा आडिवरेकर, नगराध्यक्ष अँड. जमिर खलिफे, माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, मजिद पन्हळेकर, शिवसेनेचे राजा काजवे, भाजपाचे वसंत पाटील, व्यापारी संघाचे दिनानाथ कोळवणकर आदी उपस्थित होते.

या प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती जाणून न घेता प्रकल्पाला होणारा विरोध हा राजकीय असून तो तालुक्याच्या भवितव्याला हानिकारक आहे, हे सत्य शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रकल्प समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.