रत्नागिरी - अरबी समुद्रात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाल्याने जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे. गेले 2 दिवस जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. गेल्या काही वर्षांपासून वातावरण बदलाचे परिणाम सातत्याने दिसून येत आहेत. त्यामुळे पावसाचा हंगाम संपला तरीही अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे केवळ महाराष्ट्रच नाही तर अनेक राज्यांत पाऊस पडत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे या वादळी चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने जोवाड चक्रीवादळा बाबत अलर्ट जारी ( Jawad Cyclone Alert Issued Maharashtra ) केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य आणि मध्य भारताच्या लगतच्या भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला आहे.
शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ -
दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून पूर्व मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं. सायंकाळीही जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम फळबागांवर होणार असल्याने बागायतदार चिंतेत आहेत
-
NDRF Deploys 62 Teams across Andhra Pradesh, Odisha, West Bengal, Tamil Nadu and A&N Islands in view of impending Cyclone JAWAD@ndmaindia@PMOIndia@HMOIndia@BhallaAjay26@PIBHomeAffairs@ANI@PTI_News@DDNewslive@DDNewsHindi pic.twitter.com/FpRwp3iVwg
— NDRF 🇮🇳 (@NDRFHQ) December 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NDRF Deploys 62 Teams across Andhra Pradesh, Odisha, West Bengal, Tamil Nadu and A&N Islands in view of impending Cyclone JAWAD@ndmaindia@PMOIndia@HMOIndia@BhallaAjay26@PIBHomeAffairs@ANI@PTI_News@DDNewslive@DDNewsHindi pic.twitter.com/FpRwp3iVwg
— NDRF 🇮🇳 (@NDRFHQ) December 1, 2021NDRF Deploys 62 Teams across Andhra Pradesh, Odisha, West Bengal, Tamil Nadu and A&N Islands in view of impending Cyclone JAWAD@ndmaindia@PMOIndia@HMOIndia@BhallaAjay26@PIBHomeAffairs@ANI@PTI_News@DDNewslive@DDNewsHindi pic.twitter.com/FpRwp3iVwg
— NDRF 🇮🇳 (@NDRFHQ) December 1, 2021
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आग्नेय अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे पूर्व-मध्य अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांशी संवाद साधत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आता वादळी 'जोवाड' चक्रीवादळ येणार!
राज्यात हवामानात बदल झाला आहे. हवामानातील बदलामुळे 2 डिसेंबरपर्यंत देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. 3 डिसेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढेल आणि त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल.
'जोवाड' 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार!
महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाचे कारण सांगताना, अंदमान समुद्राच्या मध्यभागी असलेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत पश्चिम-उत्तर आणि पश्चिमेकडे सरकेल, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला होता.
त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. आतापर्यंत हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणेच घडले आहे. आता हे वादळ 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे ईशान्येकडील राज्यांमध्येही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गुजरातमध्येही मुसळधार पावसाचा इशारा
अरबी समुद्रातील या चक्रीवादळाची तयारी आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे गुजरातमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला ( Alert for Gujrat Fisherman ) दिला आहे. शेतकऱ्यांना त्यांची कापणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
हेही वाचा - Mumbai Rain : मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस ; नागरिक हैराण