ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली 851 वर

author img

By

Published : Jul 11, 2020, 7:28 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 851 वर पोहचली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आजपर्यंत 30 जणांचा मृत्यू असून 561 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

corona victims in Ratnagiri
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 851 झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेले काही दिवस आलेख चढता आहे.

दरम्यान, यामध्ये 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 851 वर पोहचली आहे. तर आज 15 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता 561 झाली आहे. तर खेड तालुक्यातील कुंभाड येथील एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा 08 जुलै 2020 रोजी मृत्यू झाला होता. सदर मृत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृताची संख्या आता 30 झाली आहे. त्यामुळे आता एकूण 287 रुग्ण कोरोना ऍक्टिव्ह आहेत. पैकी 09 रुग्ण होम आयसोलेशन असून, 4 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले आहेत.

*अॅक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन*

जिल्ह्यात सध्या 75 अॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 22 गावांमध्ये, दापोली मध्ये 8 गावांमध्ये, खेड मध्ये 14 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 5, चिपळूण तालुक्यात 20 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 आणि राजापूर तालुक्यात 5 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

*10 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह*

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 11 हजार 942 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 664 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 851 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 10 हजार 778 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 278 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 278 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.