ETV Bharat / state

देवके येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका - leopard released

दापोली तालुक्यातील देवके येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात वनविभागाला यश आले आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व दापोलीतील सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी फासकीतून या बिबट्याची सुखरूप सुटका केली आहे.

फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने केली सुखरूप सुटका

author img

By

Published : Sep 2, 2021, 8:02 PM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील देवके येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात वनविभागाला यश आले आहे. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व दापोलीतील सर्पमित्र संघटनेच्या सदस्यांनी फासकीतून या बिबट्याची सुखरूप सुटका केली आहे.

देवके येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका
'बिबट्याची सुखरूप सुटका'

वनपाल सावंत यांनी सांगितलं की, देवके येथील विरवी फार्म हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक बिबट्या फासकीत अडकला असल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही माहिती बुधवारी सायंकाळी मिळाली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देवके येथे कर्मचाऱ्यारी दाखल झाले. दरम्यान, या बिबट्याच्या कंबरेला फास लागला होता. मात्र, प्रसंगावधान राखून वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्पमित्रांनी काम केल्यामुळे बिबट्याची यातुन सुखरूप सुटका झाली.

'बिबट्या आणला वनविभागाच्या कार्यालयात'

या बिबट्याची यातुन सुटका केल्यानंतर दापोली येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. हा बिबट्या नर असून, तो ७ वर्षाचा आहे. या सुटकेच्या कारवाईत दापोलीचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे, दापोलीचे वनपाल सावंत, खेडचे वनपाल सुरेश उपरे, मंडणगडचे वनपाल अनिल दळवी, वनरक्षक जळणे, जगताप, डोईफोडे, ढाकणे, वनसेवक संजय गोसावी, दापोलीचे सर्पमित्र सुरेश खानविलकर, किरण करमरकर व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.