ETV Bharat / state

रत्नागिरी : पाली गावात कडक लॉकडाउन; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार कारवाई - पालीमध्ये कडक लॉकडाउन

पाली गावात कोरोनाचे २ बाधीत रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये २७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावे. तसेच २ आठवड्यांसाठी आठवडाबाजारही बंद ठेवावा, असे आवाहन ग्रामपंचायत पालीतर्फे करण्यात आले आहे.

strict lockdown in pali village action will be taken against those who walk without masks in ratnagiri
रत्नागिरी : पाली गावात कडक लॉकडाऊन; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार कारवाई
author img

By

Published : Feb 21, 2021, 12:34 AM IST

रत्नागिरी - तालुक्यातील पाली गावात कोरोनाचे २ बाधीत रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये २७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावे. तसेच २ आठवड्यांसाठी आठवडाबाजारही बंद ठेवावा, असे आवाहन ग्रामपंचायत पालीतर्फे करण्यात आले आहे.

ग्रामकृतीदल समितीच्या बैठकीत निर्णय -

जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली जात आहे. पाली ग्रामपंचायत क्षेत्रातही २ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पाली गामपंचायतीच्या ग्रामकृतीदल समितीच्या पार पडलेल्या बैठकीत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, हायस्कुल, कॉलेज, आयटीआय, खासगी शिवकणी २७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई -

पालीमध्ये दर बुधवारी आठवडाबाजार भरतो. परंतु पुढील २ आठवडे हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच पाली कार्यक्षेत्रात विनामास्क फिरणाऱ्यांना १०० रुपेय दंड ठोठावण्यात येणार आहे. दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, तसेच स्यानिटायझरचा वापर करावा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट: शनिवारी 6281 नवीन रुग्णांची वाढ, 40 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.