ETV Bharat / state

Sticker war : स्टिकर युद्ध; अजित पवार यांच्या स्टिकरला नितेश राणे यांचे स्टिकरने उत्तर

छत्रपती संभाजी महाराज ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) यांच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे हे आता अधिक आक्रमक झाले आहेत. ( Sticker war ) त्यांनी आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर तयार केले आहेत. या स्टिकरचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर प्रसिद्ध केला आहे. ( sticker belongs to Sambhaji maharaj ) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे यांनी हे स्टिकर वाहनांवर चिटकवले आहेत. (sticker over sambhaji maharaj ) अजित पवार यांनी पुणे येथे स्वराज्य रक्षक संभाजी असे स्टिकर गाड्यांवर लावले होते त्याला उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांनी हे स्टिकर आंदोलन सुरू केले आहे. ( Leader of Opposition Ajit Pawar )

Sticker war
अजित पवार यांच्या स्टिकरला नितेश राणे यांचे स्टिकरणे उत्तर
author img

By

Published : Jan 9, 2023, 11:51 AM IST

अजित पवार यांच्या स्टिकरला नितेश राणे यांचे स्टिकरणे उत्तर

सिंधुदुर्ग : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहात केलेल्या विधानावरुन राजकारण तापले आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यांची मागणी भाजप नेते, हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. ( sticker belongs to Sambhaji Maharaj ) छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी मांडली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बालशौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.

धरण वीर म्हणत आमदार नितेश राणे यांची अजित पवारांवर टीका : आम्ही हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणारच असे नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यासाठी धरणवीर असा शब्द वापरला. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही, अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळींना सांगतो, असे नितेश राणे म्हणाले. धर्मवीरांना समजणे हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना नितेश राणे यांनी सणसणीत टोला लगावला. अजित पवार यांच्याकडे थोडीपण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षपदावर जो ठप्पा लागला आहे, तो त्यांनी राजीनामा देऊन पुसावा, अशा आशयाचे ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केले.

अजित पवार टिल्लू म्हणाले : नितेश राणे यांनी पत्र लिहित अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अजित पवार यांनी नितेश राणेंच्या उंचीवरुन टीका केली होती. अजित पवार यांनी टिल्लू म्हणत आमदार नितेश राणे यांची खिल्ली उडवली. अशा लोकांना मी उत्तर देत नाही त्याला माझे प्रवक्ते उत्तर देतील. अशा शब्दात अजित पवार यांनी नितेश राणे यांचा समाचार घेतला.

नितेश राणे यांनी जाहीर केला स्टिकर : दरम्यान भाजप आमदार नितेश राणे हे धर्मवीर मुद्द्यावर आणखीन आक्रमक झाले आहेत. आम्ही पण तयार आहोत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय... असे ट्विटमध्ये म्हणत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे लिहिलेला आणि संभाजी महाराजांचा फोटो असलेला स्टिकरचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. एवढ्यावरच न थांबता नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहनांवर हे स्टिकर चिटकवत हे आंदोलन आता महाराष्ट्रभर केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.