ETV Bharat / state

'काही उद्योग, व्यावसायिकांसाठी शिथिलता, मात्र सर्वसामान्यांसाठी लॉकडाउनमध्ये कोणताही बदल नाही'

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपासून संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे, मात्र ती उद्योग, व्यावसायिकांसाठी मर्यादित स्वरुपात आहे. सर्वसामान्यांसाठी लॉकडाउनमध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा मुभा देण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/21-April-2020/6875133_394_6875133_1587452710775.png
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे
author img

By

Published : Apr 21, 2020, 1:00 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात सोमवारपासून संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे, मात्र ती उद्योग, व्यावसायिकांसाठी मर्यादित स्वरुपात आहे. सर्वसामान्यांसाठी लॉकडाउनमध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा मुभा देण्यात आलेली नाही, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी बोलताना डॉ. मुंढे म्हणाले की, नागरिकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. सोमवारपासून (ता. 20) लॉकडाऊनमधून शिथिलता मिळणार, असा समज आहे. मात्र असे काही नाही. सर्वसामान्य नागरिकांना या नियमांमधून कोणतीही मुभा नाही. जो लॉकडाऊन 22 मार्चपासून सुरू होता, तोच आता 3 मेपर्यंत राहणार आहे. मात्र यातून काही उद्योग, व्यवसायांना परवानगी दिली आहे. ते ही ज्या ठिकाणी कामगारांची व्यवस्था होईल, असेच उद्योग, व्यवसाय आणि विकासकामे सुरू केली जाणार आहेत. दुसर्‍या गावातील कामगार असतील तर त्यांना एकदाच आणता किंवा सोडता येणार आहे. त्यानंतर संबंधित एजन्सी किंवा कंपनीने त्याची जबाबदारी घ्यायची आहे. रोज ये-जा करण्यास परवानगी नाही. मात्र काही अत्यावश्यक सेवा त्याला अपवाद आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

यावेळी जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, आम्ही शासकीय कामे, बांधकामे, रस्ते आदीबाबत सर्व एजन्सी, कंपनी, ठेकेदारांना योग्य त्या मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. त्या अटी-शर्थींना पाळूनच त्यांनी कामे करायची आहेत. त्यामध्ये सिमेंट, खडी, डांबर आदीचा समावेश आला. मात्र, स्थानिक कामगारांवरच हे सर्व चालणार असल्याचं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

दरम्यान पालघरयेथे झालेली घटना ही अमानवी आणि दुर्दैवी आहे. अशी घटना जिल्ह्यात होता कामा नये, यासाठी बाहेरून कोणी आले तरी त्याची माहिती पोलिसांना द्यावी मात्र कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी यावेळी केलं. तसेच पवित्र रमजान सुरू होतोय, सरकारने मार्गदर्शन तत्त्वे दिली आहेत. त्यामुळे नागरिकांनी नमाज, इफ्तार सामूहिक स्तरावर नको, तर वैयक्तिक करावे, असे आवाहनही डॉ. मुंढे यांनी यावेळी केलं..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.