ETV Bharat / state

रत्नागिरीत सर्पसह विंचू दंशाचे प्रमाण वाढले, जिल्हा रुग्णालयात १६४ रुग्ण दाखल - रत्नागिरीत सर्प आणि विंचू दंशाचे प्रमाण

ऐन भात कापणीच्या दिवसांत पाऊस आल्याने सुकविण्यासाठी कातळावर पसरवलेल्या भाताच्या पेंढया अधिक काळ एकाच जागेवर राहिल्या. त्यामुळे पेंढयांच्या खाली मोठया प्रमाणात विंचू आढळून येताना दिसत आहेत.

सर्प दंश आणि विंचू दंशाचे प्रमाण वाढले, जिल्हा रुग्णालयात १६४ रुग्ण दाखल
author img

By

Published : Nov 7, 2019, 11:41 AM IST

Updated : Nov 7, 2019, 8:07 PM IST

रत्नागिरी - भात कापणीच्या कालावधी सुरू असल्यामुळे जिल्ह्यात सर्प, विंचूदंश होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागील 2 महिन्यात केवळ जिल्हा रुग्णालयात १६४ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये १२४ सर्पदंश तर ४० विंचूदंश झालेल्या रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजारच्या पुढे गेल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सर्प आणि विंचू दंशाचे प्रमाण वाढले

ऐन भात कापणीच्या दिवसात पाऊस आल्याने सुकविण्यासाठी कातळावर पसरलेल्या भाताच्या पेंढ्या अधिक काळ एकाच जागेवर राहिल्या. त्यामुळे पेंढयांच्या खाली मोठ्या प्रमाणात विंचू आढळत आहेत. पाऊस थांबल्यानंतर भाताच्या पेंढ्या परतवणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात विंचूदंश झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - 'त्या' तहसीलदारांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीचा रुग्णालयात मृत्यू

जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हा आजुबाजुच्या पंचक्रोशीला दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा आहे. त्यामुळे लगतच्या वाटद , मालगुंड तसेच संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्ण जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येतात.

हेही वाचा - रायगडमध्ये तिहेरी हत्याकांड, पतीने पत्नीसह २ लहान मुलांची केली हत्या

सर्पदंश, विंचूदंश झालेल्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार झाल्यानंतरही ज्यांची पकृती चिंताजनक असते. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात सर्पदंशाचे ५० रुग्ण तर विंचूदंशांचे १५ रुग्ण दाखल झाले होते. याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात सर्पदंशाचे ७४ जणांना तर विंचूदंशांच्या २५ जणांना जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले होते.

Intro:जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात सर्प दंश आणि विंचू दंशाचे रुग्ण एक हजारच्या पुढे

गेल्या दोन महिन्यात केवळ जिल्हा रुग्णालायात १६४ रुग्ण दाखल

रत्नागिरी, प्रतिनिधी

भात कापणीच्या कालावधीमुळे जिल्ह्यात सर्प, विंचू दंश होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यात केवळ जिल्हा रुग्णालायात १६४ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये १२४ सर्प दंश तर ४० विंचू दंश झालेल्या रुग्णाचा समावेश आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणार्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जाकादेवी पंचक्रोशीत विंचू दंश होण्याचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालायत दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १ हजारच्या पुढे गेली आहे.
ऐन भात कापणीच्या दिवसांत पाऊस आल्याने सुकविण्यासाठी कातळावर पसरवलेल्या भाताच्या पेंढया अधिक काळ एकाच जागेवर राहिल्या. त्यामुळे पेंढयांचे खाली मोठया प्रमाणात विंचू आढळून येताना दिसत आहेत. पाऊस थांबल्याने भाताच्या पेंढया परतवणार्या शेतकर्यांना अधिक प्रमाणात विंचूदंश झाल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांतील विंचू दंशाची आकडेवारी पहाता भात कापणीचे हंगामात विंचूदंशाचे प्रमाण वाढलेले आहे.
जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हा आजुबाजुच्या पंचक्रोशीला दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा आहे.त्यामुळे लगतच्या वाटद , मालगुंड तसेच संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे येणे सोयीस्कर ठरते.त्यामुळे जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते आहे.
सर्पदंश, विंचूदंश झालेल्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार केल्यानंतर ज्याची प्रकृती चिंताजन होते. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालायत दाखल करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात ५० रुग्ण सर्पदंश तर १५ रुग्ण विंचूदंशांचे आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात ७४ जणांना सर्पदंश तर २५ जणांना विंचू दंश झाल्यामुळे जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. पुर्ण जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालायत दाखल झालेल्या रुग्णांची संख्या १ हजारच्या पुढे गेली आहे.Body:जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात सर्प दंश आणि विंचू दंशाचे रुग्ण एक हजारच्या पुढे

गेल्या दोन महिन्यात केवळ जिल्हा रुग्णालायात १६४ रुग्ण दाखलConclusion:जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात सर्प दंश आणि विंचू दंशाचे रुग्ण एक हजारच्या पुढे

गेल्या दोन महिन्यात केवळ जिल्हा रुग्णालायात १६४ रुग्ण दाखल
Last Updated : Nov 7, 2019, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.