गणपतीपुळे (रत्नागिरी) - लॉकडाऊनमध्ये तब्बल आठ महिने बंद असलेले गणपतीपुळे मंदिर आजपासून शासनाच्या निर्णयामुळे भाविकांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथे देखील भाविक दाखल झाले आहेत. मंदिर सुरू झाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकही आनंद व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिर खुले; भाविकांची गर्दी
व्यावसायिक घेत आहेत योग्य ती खबरदारी
कोरोनामुळे मंदिर बंद झाल्याने आमची दुकानेही बंद झाली होती. मात्र आता दुकाने सुद्धा सुरू झाली आहेत. योग्य ती खबरदारी घेऊन ग्राहक आणि आमच्यामध्ये पारदर्शक प्लास्टिक लावून दुकाने चालवत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक व्यवसायिक पराग केदार यांनी दिली आहे. दुकान बंद असल्याने आमची परिस्थिती हलाखीची झाली होती, कारण आमचे पोट पूर्णतः या व्यवसायावर अवलंबून आहे. पण आता मंदिरे सुरू झाल्याने, आमची दुकानंही सुरू झाली आहेत. त्यामुळे आनंद होत असल्याची प्रतिक्रिया कुमार राजवाडकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरुवात; चेन्नईतील भक्तांना मिळाला सर्वप्रथम दर्शनाचा मान