रत्नागिरी - मराठा आरक्षण स्थगितीचा फटका वैद्यकीय प्रवेश प्रक्रियवर झाला आहे. आर्थिक मागास दुर्बल घटकांचे म्हणजेच ईडब्यूएसचे राज्य सरकारकडून आरक्षण मिळावे ही मागणी आहे. हे आरक्षण दिले असते तर मराठा समाजाची जवळपास ६०० विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहिली नसती. आज जे नुकसान झाले, त्याला सरकारची निष्क्रियता आणि सरकारमधील काही मराठा समाजाचे मंत्री यांच्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. ते खेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संघटनेचे सरचिटणीस विक्रांत आंब्रे उपस्थित होते. यावेळी बोलताना मेटे म्हणाले की, सरकारचे जर हे असेच सुरू राहिले, तर शिवसंग्राम न्यायालयात जाईल, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
ओबीसी आणि मराठा समाजात काही जणांचा तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - ओबीसी आणि मराठा समाजात तेढ विनायक मेटे
ओबीसी आणि मराठा समाजात तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचे काम सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधील काही मंत्री करत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी यावेळी केला आहे.