ETV Bharat / state

Bhaskar Jadhav : महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय चुकीचे होते का; भास्कर जाधव यांचा संताप - भाजप

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना आताच्या सरकारने स्थगिती दिली आहे. यावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) यांनी संताप व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 1 एप्रिल रोजी जो निर्णय घेण्यात आला, त्या सरकारमध्ये तुम्ही होतात. तुम्ही ज्या सरकारमध्ये होतात त्या निर्णयांना स्थगिती मिळते. याचा अर्थ तुम्ही त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे होते का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

MLA Bhaskar Jadhav
आमदार भास्कर जाधव
author img

By

Published : Jul 20, 2022, 6:54 PM IST

रत्नागिरी - उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना आताच्या सरकारने स्थगिती दिली आहे. यावरून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जाधव यांनी म्हटलं आहे की, आज ज्या मंडळींनी भाजप ( BJP ) बरोबर जाऊन सरकार बनवलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या सरकारमध्ये जे मंत्री होते असे 9 मंत्री सध्याच्या सरकारमध्ये आहेत. 1 एप्रिल रोजी जो निर्णय घेण्यात आला, त्या सरकारमध्ये तुम्ही होतात. तुम्ही ज्या सरकारमध्ये होतात त्या निर्णयांना स्थगिती मिळते. याचा अर्थ तुम्ही त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे होते का? ज्या सरकारला तुम्ही पाठिंबा दिलाय त्याच सरकारने तुम्ही घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तेव्हा तुम्ही गप्प का? याचा अर्थ आता तुम्ही आता ज्या सरकारला पाठींबा दिलेला आहे, त्या सरकारला तुमच्या पाठींब्याचं महत्व राहिलेलं नाही, असं भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) यांनी म्हटलं आहे. ते आज चिपळूणमध्ये बोलत होते.

भास्कर जाधव यांची शिंदे सरकारवर प्रतिक्रिया

हेही वाचा - OBC Reservation : दोन आठवड्यात निवडणुका घ्या; न्यायालयाची दिशाभूल करू नका : सर्वोच्च न्यायालय

लोकशाहीची चिंता वाटते - एकनाथ शिंदे गटाच्या ( Eknath Shinde group ) 16 आमदारांच्या अपत्रातेबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. याबाबत बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, आजच्या निकालावर केवळ देशाचेच नाही तर जगाचं लक्ष होतं. पण आज आलेल्या निकालावर फार काही आश्चर्य वाटत नसलं तरी लोकशाहीची चिंता वाटते. वेळेवर न्याय न मिळणे निर्णय वेळेत न होणं हे लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणामुळे लोकशाहीची चिंता वाटते, असं जाधव यांनी म्हटलं आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे. जे काही घडतंय ते मी ऐकतोय पाहतोय. मात्र, रामदास कदम यांना एकदा रोखठोक उत्तर द्यावं लागेल. ते योग्य वेळी देणार आहे असाही इशारा आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) यांनी दिला आहे.

हेही वाचा -Sidhu Moose Wala Murderer Encounter : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन गॅंगस्टर्सचे पोलिसांकडून एन्काउंटर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.