रत्नागिरी - होळी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. त्यानिमित्त कोकणामध्ये शिमगोत्सव सुरू झाला आहे. यामध्ये 'नमन आणि खेळे' खरे रंग भरतात. गुहागर तालुक्यातील अडूर येथे श्री सुंकाई देवीचा नमन मंडळामध्येही संकासुराचं मुख्य आकर्षण असते.
लांब पांढरी दाढी, डोक्यावर टोपरे, अंगात काळ्याचे रंगाचे कापड, असा संकासुराचा पेहराव असतो. सुंकाई देवीच्या मानाच्या होळीच्या दिवशी मंदिर परिसरात खेळे सादर केले जातात. त्यानंतर होळी पेटविली जाते. पेटत्या होळी भोवती मानकरी आणि खुम होळीभोवती धावतात. त्यांना पकडण्यासाठी एकटा संकासुर हा आगीतून आणि निखाऱ्यातून धावत असतो. असा हा खेळ गेली अनेक वर्षांपासून अडूर या गावात खेळला जातो.
अडूर येथे हा सर्व खेळ पाहायला मिळतो. यावेळी सर्व समाजातील नागरिक हा खेळ बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. संकासुराला ओरडून ओरडून डिवचले जाते. तसेच त्या मानकऱ्यांना पकडण्यासाठी संकासूर हा होळीच्या आगीतून आणि निखाऱ्यातून धावत असतो.