ETV Bharat / state

सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण रत्नागिरीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा - south ratnagiri district

महापुरामुळे दक्षिण रत्नागिरीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. काल(बुधवार) दुपारपासून दक्षिण रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे. परिणामी सर्वच पेट्रोल पंप बुधवारी दुपारपासून बंद आहेत.

बुधवारी दुपारपासून दक्षिण रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे
author img

By

Published : Aug 8, 2019, 7:39 PM IST

रत्नागिरी - पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि खचलेल्या रस्त्यामुळे आंबा घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या दक्षिण रत्नागिरीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. महापुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या गाड्या दक्षिण रत्नागिरीमध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाच्या संकटाबरोबरच रत्नागिरीकरांना आता इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

बुधवारी दुपारपासून दक्षिण रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे
दक्षिण रत्नागिरीतील लांजा, राजापूर आणि रत्नागिरी शहरात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. मिरज हजारेवाडीतल्या डेपोमधून पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या दक्षिण रत्नागिरीत इंधन घेऊन येतात. मात्र या भागात पुराचे पाणी असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल घेवून येणाऱ्या गाड्या पोहचू शकलेल्या नाहीत. बुधवारी दुपारपासून दक्षिण रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा तुटवडा आहे. परिणामी सर्वच पेट्रोल पंप बुधवारी दुपारपासून बंद आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी सर्वसामान्यांची धावपळ होत असलेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, वाशीच्या इंधन डेपोतून पेट्रोल-डिझेलच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. मात्र त्याही अद्याप आलेल्या नाहीत.

Intro:सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण रत्नागिरीत पेट्रोल डिझेलचा खडखडाट

काल दुपारपासून पेट्रोलपंप आहेत बंद

रत्नागिरी, प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर तसेच रस्ता खचल्याने आंबा घाटातील वाहतुकीवर झालेला परिणाम त्यामुळे दक्षिण रत्नागिरीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. महापुरामुळे गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या गाड्या दक्षिण रत्नागिरीत आलेल्या नाहीत..
त्यामुळे दक्षिण रत्नागिरीतील लांजा, राजापूर आणि रत्नागिरीत पेट्रोल-डिझेलचा खडखडाट जाणवत आहेत. मिरज हजारेवाडीतल्या डेपोतून पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या दक्षिण रत्नागिरीत इंधन घेवून येतात. मात्र या भागात पुराचे पाणी असल्यामुळे इथपर्यत पेट्रोल आणि डिझेल घेवून येणाऱ्या गाड्याच पोहचू शकलेल्या नाहीत. त्यामुळे बुधवारी दुपारपासून दक्षिण रत्नागिरीतल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधनाचा खडखडाट जाणवत आहे. त्यामुळे सर्वच पेट्रोल पंप आज बंद आहेत. आजचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी सर्वसामान्यांची धावपळ होत असलेली पहायला मिळत आहे. दरम्यान वाशीच्या इंधन डेपोतून पेट्रोल-डिझेलच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत.. मात्र त्याही अद्याप आलेल्या नाहीत.. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपावर खडखडाट जाणवत आहे.. रत्नागिरीतल्या पेट्रोल पंपावरून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
Body:सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण रत्नागिरीत पेट्रोल डिझेलचा खडखडाट

काल दुपारपासून पेट्रोलपंप आहेत बंद
Conclusion:सलग दुसऱ्या दिवशी दक्षिण रत्नागिरीत पेट्रोल डिझेलचा खडखडाट

काल दुपारपासून पेट्रोलपंप आहेत बंद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.