रत्नागिरी - पावसापाठोपाठ आता समुद्रातील लाटांचा फटका मिर्या ते पंधरामाड परिसराला बसत आहे. अजस्त्र लाटांमुळे येथील बंधारा आणि त्यावरील रस्ता पूर्णतः वाहून गेला आहे. शिवाय या लाटांनी घरांचे कठडेही वाहून गेले आहेत.
पाणी कधीही नागरी वस्तीत घुसू शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. पंधरामाड परिसरातील धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासह रस्ता वाहून गेला आहे.