रत्नागिरी- नुकत्याच संपन्न झालेल्या ‘कोकण टुरिझम कॉन्क्लेव्ह’साठी देशभरातील नवी दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, चंडीगड, गोवासह महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, लातूर, पुणे, मुंबई येथून आलेल्या 'टूर ऑपरेटर्स'नी सोमवारी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेच्या निमंत्रणाला मान देत डेस्टिनेशन चिपळूणला भेट दिली. यात त्यांनी क्रोकोडाईल टुरिझम आणि बोट सफारीचा आनंद घेतला. यावेळी देशभरातून आलेल्या सुमारे 60 टूर ऑपरेटर्सकरिता येथील गोवळकोट धक्का येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा- इंग्रजीची भीती विसरून कैदी गिरवताहेत धडे; हर्सूल कारागृहातील चित्र
हा विशेष कार्यक्रम डेस्टिनेशन चिपळूण समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याच्या प्रतिक्रिया यावेळी टूर ऑपरेटर्सनी नोंदविल्या. सर्व टूर ऑपरेटर्सचे दुपारी गोवळकोट धक्का येथे आगमन झाल्यानंतर सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मगरमच्छों का गांव’ ही विशेष डॉक्युमेंटरी स्टोरी दाखविण्यात आली. संस्थेचे पी.पी.टी. प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले. चिपळूण आणि परिसरातील एसआर. जंगल रिसॉर्ट (धामणवणे), आम्रबन (परशुराम), लेटेंटफार्म (तळवली), नेचर हार्मनी (रामपूर), डेस्टिनी (नांदिवसे), वनालिका (मार्लेश्वर), तुंबाड किनारा (तुंबाड) याबाबत माहिती देण्यात आली.
ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष श्रीराम रेडिज यांनी संस्थेच्या प्रयत्नांची माहिती दिली. सचिव संजीव अणेराव यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा आढावा घेतला. पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी डेस्टिनेशन चिपळूणबाबत माहिती दिली. यात त्यांनी चिपळूण पर्यटन, संग्रहालय, वाशिष्ठी परिक्रमा, दाभोळ ते गोवळकोट या विषयांना स्पर्श केला. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र टुरिझमचे अध्यक्ष उदय कदम, गोवा पर्यटनसाठी काम करणारे प्रसिद्ध टूर ऑपरेटर मिलिंद आयरे, पर्पल टूर्सचे संजीव नाईक आदिंचा यावेळी सन्मान करण्यात आला. आलेल्या टूर ऑपरेटर्समध्ये साहिबजी ऑनलाईन, नवी दिल्ली, पर्पल ट्रिप्स, बॉन व्होयाज, मोक्सन टूर्स नवी दिल्ली, ओम व्हेकेशन, बाफना हॉलिडेज, ट्रॅव्हल कॉन्टिनेन्ट, अवनी ट्रॅव्हल्स नागपूर, विंग्स वेव्ह, विनायका हॉलिडेज, ग्रीन अॅपल, लातूर, शंतनू ट्रॅव्हल वर्ल्ड, जे.डी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स वडोदरा, थ्री सिक्सटी व्हेकेशन, ड्रीम हॉलिडे, अनिकेत टूर्स, औरंगाबाद, मॅजिक मॉमेंट, नेक्स्ट स्टेप, ड्रीम व्हेकेशन, व्हिस्टा टूर्स, व्हिजन टुरिझम, वीणा ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हल वर्ल्ड, सचिन हॉलिडे, ट्रॅव्हल हब, नागपूर, ट्रॅव्हल वे अहमदाबाद, एस.एस.के. ट्रॅव्हल्स, द डेस्टीनेशन्स आदि नामवंत संस्थांचा समावेश होता.
भोजनपूर्व काळात सर्वांनी बोटिंगचा आनंद घेतला. सर्वांना मगरदर्शनही झाले. बोटिंग दरम्यान वन्यजीव अभ्यासक निलेश बापट, व्यवस्थापक विश्वास पाटील, धीरज वाटेकर, प्रल्हाद लाड यांनी बोटीत उपस्थितांना क्रोकोडाईल टुरिझमची माहिती दिली. यावेळी संस्थेचे राजू पाथरे, समीर जानवलकर, महेंद्र कासेकर, विलास महाडिक, अलिम परकार आदि संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे गोवळकोट धक्यावर अत्यंत उत्साही वातावरण निर्माण झाले होते. अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच डेस्टिनेशन चिपळूण दृष्टीपथास येईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.