ETV Bharat / state

चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर; अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू, पुण्यातून NDRF रवाना - पावसाचा हाहाकार

चिपळून शहर सध्या पाण्यात आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे. जिल्ह्यासाठी पुणेहून NDRF च्या दोन टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघाल्या आहेत

चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर
चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर
author img

By

Published : Jul 22, 2021, 1:18 PM IST

Updated : Jul 22, 2021, 5:28 PM IST

रत्नागिरी - चिपळूणमध्ये सध्या पावसाने हाहाकार उडवला आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहर जलमय झालं आहे. शहरात पुराच्या पाण्याने वेढा दिला असून पाऊस आणि पुराने हाहाकार उडवला आहे. 2005 पेक्षाही गंभीर परिस्थिती चिपळून शहरात निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात पुराचे पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. परिस्थिती गंभीर होत असल्याने चिपळून नगरपरिषदेने बचावकार्यास सुरुवात केली आहे. तर पुण्याहून एनडीआरएफच्या 2 तुकड्या रत्नागिरीसाठी रवाना झाल्या आहेत.

चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर

काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी -

बुधवारी दुपारपासून रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर चिपळून शहर सध्या पाण्यात आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड , भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे. काही ठिकाणी पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे.. तर खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे.

चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर
चिपळूणमध्ये पूरस्थिती गंभीर

रेस्क्यू ऑपरेशन सुरू, एनडीआरएफ दाखल होणार-

दरम्यान हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे. स्थानिक चिपळूण नगरपालिकेच्या 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी मधून 1 , पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे ( खेड साठी 1 व चिपळूण साठी 1)येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी समन्वय करणेत येत असून, प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत असल्याची माहिती जिल्हा
प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - रत्नागिरी, कोल्हापूर पाण्याखाली : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल; NDRF पथक रवाना

Last Updated : Jul 22, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.