रत्नागिरी - आमदार उदय सामंत ( MLA Uday Samant ) यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेनेचे ( Shivsena ) ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते सामंत ( Union Minister Anant Gite ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काही लोकांना व्यासपीठ मिळत नाही, ते व्यासपीठ मिळाल्यामुळे गीतेंनी आमच्यावर टिका केली, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. उदय बने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळ्यात अनंत गीते यांनी उदय सामंत यांच्यासह बंडखोर आमदारांचा ( Rebel MLA ) समाचार घेतला होता.
या टीकेला प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले की, 6 महिन्यांपूर्वी गीते यांनी एक मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शिवसेनेला संपवतेय असं सांगत शरद पवार यांच्याबद्दल खालच्या भाषेतील शब्दप्रयोग वापरला होता. घटक पक्ष शिवसेनेला संपवत आहेत, ही भूमिका मांडणारे अनंत गीते पहिले होते. म्हणजे ते गद्दार झाले का ? त्यांच्या मनातील त्यांनी मांडली, तीच भावना एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी सोबत राहू नये, अशीच भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं सांगत उदय सामंत यांनी शिवसेना नेते अनंत गितेंवर निशाणा साधला आहे.
मी वाईट झालो, उदय सामंत - दरम्यान आमदार योगेश कदम यांना ताकद द्यावी, प्रत्येक तालुक्यात मेळावे घेतले जावेत असं मला पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र, दीड महिन्यानंतर मला असं सांगण्यात आलं की, योगेश कदमच्या विरोधात जाऊन आपण तिकिटं घेतले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आपण युती केली पाहिजे, असे सांगण्यात आले. या सर्वांचा साक्षीदार मी आहे. त्यामुळे योगेश कदम, रामदास कदम यांच्याबरोबर मी वाईट झालो, जे खरे वाईट करणारे होते ते वाईट झाले नाहीत.
आम्ही शिवसेनेत नसतो तर...- निष्ठावंतांच फारच वातावरण निर्माण केले जात आहे. काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, आम्ही शिवसेनेत नसतो तर निवडणुक आयोगाकडे केस चालू झाली नसती. एकनाथ शिंदे आम्ही शिवसेनेत आहोत असंच सांगत आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेतच आहोत. कोर्टाच्या सुनावणी संदर्भात बोलणं योग्य नाही. माझ्या संपर्कात सिंधुदूर्ग पासून रत्नागिरीपर्यत सर्वजण असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
विनायक राऊत यांच्यावर प्रहार - तसेच सामंत म्हणाले की, गद्दार, बाडगा हे शब्द फेंमस झाले आहे. त्यामुळे हे शब्द वापरल्याशिवाय टाळ्या मिळत नाही. त्यामुळे हे शब्द वापरणाऱ्यांना मला किंमत द्यायची नाही, असं सांगत सामंत यांनी अप्रत्यक्षपणे अनंत गिते आणि विनायक राऊत यांच्यावर प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे हे आमचे नेते राहणार आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मला माझ्या मतदारांवर पुर्ण विश्वास असल्याचंही सामंत म्हणाले.
राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने राहू नये - कोण काय बोलतं याला मी किंमत देत नाही, मनोरंजनाचा कार्यक्रम असतो. काही लोकांना व्यासपीठ मिळत नाही. दोन- चार वर्षानंतर व्यासपीठ मिळालं की टिका करायची. अनंत गिते यांनी या पुर्वीच राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने राहू नये, हि भूमिका का मांडली. गिते यांनी याचे प्रामाणिकपणे उत्तर दिलं पाहिजे, असा थेट प्रश्न सामंत यांनी अनंत गिते यांना विचारला आहे.
हेही वाचा - ईडीला अटक आणि जप्तीचा अधिकार आहे का? पीएमएलएतील तरतुदींवर आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय