रत्नागिरी - सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील मतमोजणीची तयारी पुर्ण झाली, असून प्रशासन मतमोजमीसाठी सज्ज झाले आहे. रत्नागिरीतील एमआयडीसीमधील एफसीआय गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नारायण राणे विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत या मतदार संघात होणार आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवर मोजणी करण्यात येणार आहे. VVPAT सह प्रथमच निवडणूक होत असल्याने प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील 5 VVPAT ची पडताळणी केली जाणार आहे. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघामधील मतमोजणी एमआयडीसी रत्नागिरी येथील एफसीआय गोडावूनमध्ये सकाळी 07.00 वाजतापासून केली जाणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून मतमोजणी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पक्षनिहाय कार्यकर्त्यासाठी मतमोजणी निकालापर्यंत थांबण्यासाठी, त्यांच्या वाहनाच्या पार्किंगसाठी नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान मतमोजणीसाठी कशाप्रकारे तयारी करण्यात आली आहे.