ETV Bharat / state

रत्नागिरीतही खगोलप्रेमींनी लुटला खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद - खंडग्रास सूर्यग्रहण न्यूज

रत्नागिरीतील खगोलप्रेमींनी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. सुरुवातीला ढगाळ असल्यामुळे नागरिकांना सूर्यग्रहण पाहण्यास मिळेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, पाऊस पडल्यानंतर ढगाळ वातावरण बदलले आणि रत्नागिरीतील खगोलप्रेमींना खंडग्रास सूर्यग्रहण पाहता आले.

solar eclipse of 2020
खग्रास सुर्यग्रहण
author img

By

Published : Jun 21, 2020, 4:26 PM IST

रत्नागिरी - भारतात यावर्षी दिसणारे एकमेव सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद रत्नागिरीतल्या खगोल प्रेंमींनीही लुटला. रत्नागिरीतही अनेक ठिकाणी आज खंडग्रास सूर्यग्रहण पाहता आले. रत्नागिरीतल्या खगोल प्रेमींनी विविध उपकरणांचा वापर करुन हे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद लुटला. साडेअकरा वाजता खंडग्रास सूर्यग्रहणाचा परमोच्च बिंदू पाहायला मिळाला. त्यानंतर ग्रहण सुटायला सुरवात झाली.

रत्नागिरीत सकाळी ढगाळ हवामान असल्याने सूर्यग्रहण दिसणार की नाही अशी याबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र, सूर्यग्रहण सुरु होण्याआगोदर झालेल्या पावसाने ढगाळ हवामानात अचानक बदल झाला. सूर्य आकाशात दिसत होता. त्यानंतर रत्नागिरीतून दिसणाऱ्या खंडग्रास सुर्यग्रहणाचा आनंद रत्नागिरीतल्या खगोल प्रेमींनी लुटला.

यंदाच्या वर्षी आज (रविवार) झालेले सूर्यग्रहण हे शतकातील महत्त्वाचे सूर्यग्रहण होते. हे सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसत होते. काही भागात कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.