ETV Bharat / state

कोरोनाचा सक्षमपणे सामना करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यास प्राधान्य द्या - मुख्यमंत्री - cm thackeray inaurate covid hospital oni

अगदी 8 दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीचे यशस्वी व्यवस्थापन करुन आता जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

uddhav thackeray ratnagiri
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
author img

By

Published : May 31, 2021, 6:50 AM IST

रत्नागिरी - कोरोनाचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नवीन कोविड केंद्र उभारुन बेड्स व रुग्णसुविधेसाठी रुग्णवाहिका आदी सुविधांसोबत सर्वाधिक लक्ष ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर द्यावे आणि शक्य त्याठिकाणी ऑक्सिजन निर्मितीस प्रारंभ करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरेंच्या हस्ते काल (रविवारी) रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयातील समर्पित कोविड रुग्णालयाच्या 200 खाटांचा दुसरा टप्पा आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथील 30 खाटांच्या समर्पित कोविड रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ऑक्सिजनची उपलब्धता जरुर ठेवा -

अगदी 8 दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीचे यशस्वी व्यवस्थापन करुन आता जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेतर्फे खास महिला व लहान बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार ही निश्चित चांगली बाब आहे. सोबतच आपण ऑक्सिजनची उपलब्धता जरुर ठेवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता 1200 मेट्रीक टन आणि मागणी 1700 मेट्रीक टन अशी स्थिती दुसऱ्या लाटेत निर्माण झाली. त्यामुळे इतर ठिकाणांवरुन ऑक्सिजन आणावा लागला, अशी स्थिती यापुढे येणार नाही याची खबरदारी घ्या. कोरोनाचा सामना करताना अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - पूर्ण बहुमत असतानाही मोदींचा कारभार नियोजन शून्यच - पृथ्वीराज चव्हाण

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास जिल्हा पूर्णपणे तयार - पालकमंत्री

म्यूकरमायकोसिस हा कोरोनातील औषधांमुळे होणारा आजार आहे. यासाठी याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. याकरिता 'माझा डॉक्टर' ही संकल्पना महत्त्वाची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यात रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर आणि मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास जिल्हा पूर्णपणे तयार आहे, असे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालय -

तळकोकणात मुंबई-गोवा महामार्गावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी केली. यासाठी जागाही उपलब्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर असा प्रस्ताव आपण आणावा, याबाबत जरुर सकारात्मक भूमिका ठेवून रुग्णालय होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा - कोरोनाबाधित रुग्ण असताना विलगीकरण कक्षाच्या स्वछतागृहांची शाळकरी मुलाकडून हाताने स्वच्छता, बुलडाण्यातील प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.