ETV Bharat / state

रत्नागिरीकरांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; केंद्रीय पथक पुन्हा कोकणात

author img

By

Published : Jun 20, 2020, 7:33 AM IST

केंद्राचे पथक निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची संपूर्ण पाहणी न करताच माघारी परतले. याविषयी रत्नागिरीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून त्वरीत दखल घेण्यात आली आणि केंद्रीय पथकाला पुन्हा रत्नागिरीचा दौरा करण्याचे आदेश देण्यात आले.

prime minister office noticed complaint Ratnagiri citizens
रत्नागिरीकरांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; केंद्रीय पथक पुन्हा कोकणात

रत्नागिरी - केंद्राचे पथक निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची संपूर्ण पाहणी न करताच माघारी परतले. याविषयी रत्नागिरीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून त्वरीत दखल घेण्यात आली आणि केंद्रीय पथकाला पुन्हा रत्नागिरीचा दौरा करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेतली जाते, याचा सुखद अनुभव रत्नागिरीकरांना अनुभवता आला.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी 17 जून रोजी केंद्राचे पथक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले होते. दौऱ्याची सुरुवात मंडणगड तालुक्यातून झाली होती. मात्र दापोली तालुक्यातील फक्त केळशी गावाला भेट दिल्यानंतर हे केंद्राचे पथक माघारी परतले. आपला नियोजित संपूर्ण दौरा या पथकाने केला नाही. त्यांनी आंजर्ले, पाजपंढरी, हर्णे, कर्दे, मुरुडची पाहणी केली नव्हती. त्यामुळे नाराज झालेल्या काही जागरूक ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मात्र पंतप्रधान कार्यालयाने या पथकाला पुन्हा दापोली तालुक्याच्या दौऱ्यावर जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी या पथकाने दापोली तालुक्यातील हर्णे, पाचपंढरी, मुरुड, कर्दे या गावांंची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या आंजर्ले गावाला केंद्रीय पथकाने भेट घेत ग्रामस्थांशी संवाद साधला.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना केंद्रीय पथकाचे अधिकारी....

दापोली तालुक्यातील आंजर्ले, पाजपांढरी, हर्णे, मुरुड, कर्दे या नियोजित गावांना या पथकाने भेटी दिल्या. नुकसानीची पाहणी करत लोकांशी संवाद साधला. शुक्रवारी या दौऱ्याची सुरुवात आंजर्ले गावापासून करण्यात आली. आंजर्ले गावातील राजेंद्र खेडेकर यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घराची या पथकाने पाहणी केली. तसेच त्यांच्या नारळ-पोफळीच्या बागेच्या पंचनाम्याची सुद्धा चौकशी केली. यावेळी आंजर्ले गावातल्या ग्रामस्थांनी केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश कुमार गणता यांनी आंजर्ले गावातील नारळ-सुपारी व आंबा बागांचे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. आंजर्ले गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेश जैन यांनी या गावातल्या संपूर्ण नुकसानीची माहिती केंद्रीय पथकाला दिली.

हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ: कोकणाला 360 कोटींची मदत मिळणार, उदय सामंतांची माहिती

हेही वाचा - 'त्या' जहाजाप्रकरणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून संबंधित मालकाला नोटीस...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.