ETV Bharat / state

प्रमोद जठारांचे खासदार विनायक राऊत, उदय सामंत, राजन साळवी यांना आव्हान - माजी आमदार प्रमोद जठार

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाणारमध्ये जागा घेणाऱ्यांना गृहखात्यामार्फत चौकशी करण्याची धमकी दिली. मात्र, येथे ठाकरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनीच हजारो एकर जागा घेतलेल्या आहेत. हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असे प्रमोद जठार यांनी म्हटले.

Pramod jathar
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार
author img

By

Published : Mar 3, 2020, 11:02 AM IST

रत्नागिरी - भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार राजन साळवी यांना खुले आव्हान दिले. नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थनाच्या सभेत ते बोलत होते.

प्रमोद जठारांचे खासदार विनायक राऊत, उदय सामंत, राजन साळवी यांना आव्हान

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नाणारमध्ये जागा घेणाऱ्यांना गृहखात्यामार्फत चौकशी करण्याची धमकी दिली. मात्र, येथे ठाकरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांनीच हजारो एकर जागा घेतलेल्या आहेत. हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असे प्रमोद जठार यांनी म्हटले.

हेही वाचा - ...तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'त्यांची' थोबडं रंगवावीत; नाणारवरून राऊत आक्रमक

रिफायनरी व्हावी अशी, आमदार राजन साळवी यांची इच्छा आहे. मात्र, ते कोणाच्या तरी दडपणाखाली असल्याने ते बोलत नाहीत. खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांबद्दल केलेल्या विधानाचाही प्रमोद जठार यांनी समाचार घेतला. 'जो कोणी शिवसैनिक रिफायनरीचे समर्थन करेल तिथे जाऊन पदाधिकाऱ्यांनी त्याचे थोबाड रंगवा', असे विनायक राऊत म्हणाले होते. राऊत कट्टर शिवसैनिक आणि भाजपमुळेच राऊत निवडून आले. राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत शिवसैनिकांची जाहीर माफी मागावी. जर त्यांनी या रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या शिवसैनिकांना हात लावला, तर त्यांना चप्पलने मारू, असा इशारा जठार यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.